गणेश विसर्जन मिरवणूकीत पाणी वाटपाचा मैत्री फौंडेशनचा कौतुकास्पद उपक्रम….
इचलकरंजी
मैत्री फौंडेशन कडून दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो तहानल्यांची तहान भागवण्याचे कौतुकास्पद काम….इचलकरंजी येथील गणेश विसर्जन मिरवणूक म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.
यावेळी इचलकरंजी आणि आजूबाजूच्या सर्व खेड्यापाड्यातून लाखो भाविक लाडक्या गणरायाला निरोप द्यायला येतात.त्यांची तहान भागवण्याचे कार्य मैत्री फौंडेशन अनेक वर्षांपासून करत आहे.
सालाबाद प्रमाणे मैत्री फौंडेशन ने यावर्षीही अनंत चतुर्थी दिवशी सर्व गणेश भक्तांना पाणी वाटप केले.
यावेळी समाजातील दानशूर व्यक्ती श्री ओमप्रकाशजी, रमेशजी, सुनीलजी यज्ञ मेहता, श्री दिपकजी चोपडा,( मुलतान मल ग्रुप) यांच्या सौजन्याने पाणी वाटप करण्यात आले.
यावेळी पाणी वाटपाचे प्रमुख पाहुणे श्री सुनील जी ओमप्रकाश मेहता, वेदमूथा(मुलतान मल ग्रुप), श्री बाबूलालजी चोपडा, श्री प्रकाशजी छाजेड, श्री महावीरजी चोपडा,श्री हिरेनजी चोपडा,श्री मित चोपडा, श्री गौतमजी छाजेड, श्री दयारामजी चौधरी, श्री खेराजराम चौधरी,
श्री पुष्पराजजी संकलेचा, श्री मनोज बालर यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थित उदघाटन झाले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मैत्री परिवारचे अध्यक्ष श्री संजय घाटगे आणि
श्री अशोक खोत सर यांनी केले. श्री बापू लाटणे, बाळू ओझा, उज्ज्वल चाराटे, नंदू माळी, कपिल, सदाशिव व्हनुगरे, बाळासाहेब कळमोडे,श्रीकांत जोशी, सुमंत वडेर, बाबुलाल तिवारी, जयकुमार बलवान, प्रकाश बलवान, देवा हुल्ले, अनिल कुंभार, अमोल कुंभार,सदा पाडळे, अरुण कोठावळे, राजू रोडे, सुरेश कोष्टी, सुरेश जमदाडे, वृषभ चराटे, ऋषिकेश जोशी, इम्रान नेजकर आणि महिला अध्यक्षा सौ. वहिदा नेजकर, सुवर्णा खराडे, अंजली शर्मा, शामल शिंगाडे,सुजाता नाझरे, लीला मालू, मिसेस वडेर, मिसेस कोष्टी यावेळी मैत्री फौंडेशन आणि मैत्री परिवारातील पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा पदाधिकारी
बहुसंख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी
मैत्री फौंडेशन चे अध्यक्ष श्री चंद्रप्रकाश छाजेड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.मैत्री फौंडेशनच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800