निरोगी आरोग्यासाठी हवा पोषक आहार:
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पोषण माह साजरा
इचलकरंजी ता.
भारतासारख्या देशात आजही कुपोषण ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे. कुपोषणामुळे बालकांचा शारीरिक व मानसिक विकास खुंटला असून ते विविध आजारांना बळी पडू शकतात. पोषणाची योग्य पातळी राखणे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळेच लोकांमध्ये योग्य आहाराबाबत जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण भारतात ‘राष्ट्रीय पोषण माह ‘चे आयोजन केले जाते. प्रत्येक व्यक्तीला निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे, यासाठी या सप्ताहाच्या माध्यमातून लोकांना संतुलित आहाराचे महत्त्व आणि योग्य पोषणाची माहिती दिली जाते. हा एक अत्यंत फायदेशीर उपक्रम आहे दरवर्षी, राष्ट्रीय पोषण सप्ताहासाठी एक विशिष्ट घोषवाक्य जाहीर केले जाते . जे संपूर्ण आठवड्यात होणाऱ्या उपक्रमांसाठी आणि कार्यक्रमांसाठी आराखडा तयार करते . २०२४ मधील राष्ट्रीय पोषण माहचे घोषवाक्य आहे, “सर्वांसाठी पौष्टिक आहार”. या घोषवाक्यासह हा सप्ताह साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाची सुरवात रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ नंदकुमार बनगे सर यांच्या हस्ते तसेच बालरोगतज्ञ डॉ. संदीप मिरजकर, डॉ. चंद्रशेखर लाटकर, रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीम. चारुशिल्पा येमल मॅडम, सहा. अधिसेविका श्रीम. सीमा कदम मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
अन्न हि सर्व सजीवांची मुलभूत गरज आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पोषक तत्वांनी परिपूर्ण असा संतुलित आहारचे सेवन करणे आवश्यक आहे.दैनदिन आहारात प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, पाणी, जीवनसत्त्व व खनिजद्रव्ये यांचे योग्य प्रमाण असावे असे रुग्णालायचे वैद्यकीय अधिक्षक डॉ नंदकुमार बनगे सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. रुग्णालायचे बालरोगतज्ञ डॉ. संदीप मिरजकर, डॉ. चंद्रशेखर लाटकर यांनी दैनदिन आहार बनवताना घ्यावयाची काळजी व वाढत्या वयानुसार आहारात कोणता बदल करावा यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच रुग्णालयाच्या आहारतज्ञ श्रीम. माधवी शहा यांनी या राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यामागचा उद्देश या संबधित मार्गदर्शन केले. या कार्यक्रमप्रसंगी बालरुग्णतज्ञ परिचारिका, सर्व विभागाच्या परिसेविका , अधिपरिचारिका, रुग्णालयीन कर्मचारी रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाह्यरुग्ण विभागाच्या अधिपरिचारिका श्रीम. राजश्री कोळी, अक्षय मोरे,करुणा तावरे यांनी केले कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अधिपरिचारिका श्रीम. हसीना नाईक यांनी केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800