इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन साजरा
इचलकरंजी
दि.१ ऑक्टोबर हा दिवस सर्वत्र जागतिक जेष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करणेत येतो.
या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार दि. १ ऑक्टोंबर २०२४ रोजी जागतिक ज्येष्ठ नागरीक दिनानिमित्त महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील यांनी ज्येष्ठ नागरीक दिनाचे आयोजन केले होते. आपल्या समाजातील महत्वपूर्ण घटकापैकी एक घटक म्हणजे ज्येष्ठ नागरीक होय. भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ नागरीकांना आदराचे स्थान आहे. ज्येष्ठ नागरीकांनी भारतीय संस्कृती व संस्कार याबाबतच्या गोष्टी शाळेतील मुलांना सांगाव्यात यामुळे आपली संस्कृती व संस्कार जपले जातील. तसेच आपले त्यांनी जिवन विषयक मौलिक अनुभव नविन पिढीला सांगावेत. असे विचार उपायुक्त स्मृती पाटील यांनी विषद करुन कार्यक्रमा साठी सर्व ज्येष्ठ नागरीकांचा गुलाबपुष्प देवून गौरव केला.
ज्येष्ठ नागरीकांचे वतीने पुंडलिक जाधव, राजाराम बोंगाळे, किरण कटके,विष्णूपंत नेतले यांनी ज्येष्ठ नागरीकांच्या करीता आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन करावे तसेच महानगर पालिकेच्या इमारतीमधील एखादी खोली ज्येष्ठ नागरीक भवन म्हणून जेष्ठ नागरिकांना देणेत यावी.ज्येष्ठ नागरीक हे महानगरपालिकेच्या कोणत्याही स्वच्छताविषयक व अन्य उपक्रमात भाग घेतील त्यांच्या अनुभवाचा फायदा महानगरपालिकेने घ्यावा असे मत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ नागरीकांच्या वतीने उपायुक्त स्मृती पाटील यांचा सत्कार करणेत आला. या कार्यक्रमास शहरातील ज्येष्ठ नागरीक तसेच महिला व बालविकास अधिकारी सीमा धुमाळ, समाज विकास अधिकारी, विकास विरकर, राजश्री जाधव, स्नेहल गेजगे, निशा आवळे आदी हजर होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800