इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने स्वनिधी से समृध्दी शिबिर संपन्न.
इचलकरंजी
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजने अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने मंगलधाम येथे दिनांक ३० सप्टेंबर २०२५ ते दिनांक २ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत तीन दिवसीय स्वनिधी से समृद्धी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरामध्ये शहरातील फेरीवाला व्यवसायिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
या योजनेअंतर्गत सुरक्षा बीमा योजना ,जीवन ज्योती बिमा योजना, श्रमयोगी मानधन योजना, जनधन योजना, वन नेशन वन राशन कार्ड योजना, जननी सुरक्षा योजना, मातृ वंदन योजना व बांधकाम कामगार योजना इत्यादी विविध योजनांचा शहरातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
सदर शिबिराचे आयोजन माननीय आयुक्त ओमप्रकाश दिवटे व उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार समाज विकास अधिकारी विकास विरकर, शहर अभियान व्यवस्थापक बाळकृष्ण व्हनखंडे आणि रमजान नदाफ यांनी केले

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800