इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान समारोपाच्या अनुषंगाने स्वच्छता सायकल रॅलीसह विविध कार्यक्रम संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान समारोपाच्या अनुषंगाने स्वच्छता सायकल रॅलीसह विविध कार्यक्रम संपन्न
इचलकरंजी
    केंद्र शासनाच्या निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १७ सप्टेंबर ते दि.२ ऑक्टोंबर या पंधरवड्यात विविध उपक्रम राबविणेत आलेले आहेत.
    आज बुधवार दि.२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून या अभियानाचा समारोप करणेत आला. या अनुषंगाने आज महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आलेले होते.
यामध्ये प्रामुख्याने महानगर पालिका अधिकारी, कर्मचारी ,
विविध सामाजिक, स्वयंसेवी, आणि क्रीडा संस्थांच्या प्रतिनिधी त्याचबरोबर विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून सायकल रॅलीचे आयोजन करणेत आले होते.
या सायकल रॅलीचा शुभारंभ छत्रपती शाहू महाराज पुतळा येथुन करणेत आला. शहरातील श्री शिवतीर्थ, के.एल.मलाबादे चौक या मुख्य मार्गावरुन महात्मा गांधी चौक येथील महात्मा गांधी  यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सदर रॅलीचा समारोप श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौकात करणेत आला.
          स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने विविध घटकांच्या अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करणेत आलेले होते. सदर स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरण समारंभ तसेच काल दि.१ ऑक्टोबर रोजी महानगरपालिका आयोजित महास्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या शहरातील विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र वितरण समारंभ श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे आयोजित करणेत आलेला होता.
         आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे आणि उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. त्याचबरोबर महानगर पालिकेच्या दोन स्वच्छता निरीक्षक यांना मुख्य स्वच्छता निरीक्षक पदी पदोन्नती देणेत आलेली आहे आणि तीन कर्मचाऱ्यांना स्वच्छता निरीक्षक पदी पदोन्नती देणेत आलेली आहे.
तसेच जवळपास ४५ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना/ कालबद्ध पदोन्नती देणेत आलेली होती.
  या कार्यक्रमाचे औचित्य साधून या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देणेत आले.
  याप्रसंगी महानगरपालिका वाहन विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ९ ई घंटागाड्यांचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
    स्वच्छता ही सेवा अभियानाचा
समारोप उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वच्छतेची शपथ घेऊन करणेत आला.
    आजच्या या कार्यक्रमासाठी
अतिरिक्त आयुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील, सहा, आयुक्त विजय कावळे, रोशनी गोडे, विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहायक संचालक नगररचना प्रशांत भोसले, प्रशासन अधिकारी इरफान पटेल, शाहू हायस्कूल मुख्याध्यापक शंकर पोवार, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, शहर समन्वयक प्रविण बोंगाळे यांचेसह मर्दा फौंडेशनचे शामसुंदर मर्दा, शहरातील रोटरी परिवाराचे
सर्व प्रतिनिधी, विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, महानगरपालिका अधिकारी कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या घटकांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More