सन्मती बँक व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व डोळे नेत्र तपासणी शिबीर
इचलकरंजी –
येथीली सन्मती सहकारी बँक (मल्टीस्टेट) व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत लायन्स ब्लड बँक येथे रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीराला उदंड प्रतिसाद लाभला.
सन्मती बँक ही सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व विविध क्षेत्रात सहभाग घेत असते. सभासदांसाठी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असते. त्याच अनुषंगाने मोफत नेत्रतपासणी शिबीराच्या माध्यमातून तपासणीसह पुढील उपचारासाठीही मदत व्हावी, बँकेकडील सभासदांना गंभीर आजारावेळी रक्ताची गरज भासल्यास ते तात्काळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याचा सभासद व सेवकांच्या परिवारास लाभ होवून बँक सामाजिक दायित्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते.
या शिबीरात बँकेचे संचालक, सभासद, खातेदार, हितचिंतक व सेवकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेवून सदर शिबीरात रक्तदान व नेत्र तपासणी करून शिबीराचा लाभ घेतला. शिबीरात बँकेचे चेअरमन सुनिल पाटील, व्हा. चेअरमन एम. के. कांबळे, संचालक संजय कुडचे, सभासद राजु माने, सीईओ अशोक पाटील, असि. सीईओ समीर मैंदर्गी, बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार, लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे चेअरमन विजयकुमार राठी, सेक्रेटरी लिंगराज कित्तुरे, ट्रेझरर विनय महाजन, गजानन होगाडे उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800