स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २३ वी उसपरिषद २५ ॲाक्टोंबरला जयसिंगपूरात- राजु शेट्टींची कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा
जयसिंगपूर ( प्रतिनिधी )
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने चालू वर्षाच्या गळीत हंगामातील २३ वी ऊस परिषद २५ ॲाक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावरती होणार आहे. त्याबरोबरच गत हंगामात तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन दोनशे रूपये द्यावे आणि मगच कारखान्याची धुराडी पेटवा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी उदगांव ता. शिरोळ येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केली.
देशातील व राज्यातील साखर उद्योग स्थिरावला आहे. साखरेसह उपपदार्थाला चांगले दर मिळाले आहेत. मात्र राज्यातील साखर कारखानदार एफ. आर. पी वगळता दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत.राज्य सरकार कारखादारांच्या पाठीशी असल्याने ऊस उत्पादक शेतक-यांना संघर्षाशिवाय काहीच पडणार नाही. केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबवित असताना विरोधी पक्ष मुग गिळून गप्प आहे.
प्रा. जालंदर पाटील बोलताना म्हणाले कि चळवळीतील ताकत व उमेदच सर्वसामान्य जनतेला न्याय देवू शकते यामुळे शेतकरी , शेतमजूर , कामगार यांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानीची चळवळ अव्याहतपणे सुरू राहील. शेतकरी संघटीत करण्याच काम स्वाभिमानीने केले आहे. राज्यातील चळवळीतील सर्व छोटे पक्ष एकत्रित करून परिवर्तन महाशक्ती आघाडी जनतेसमोर सक्षम पर्याय उभा राहिला आहे.
या कार्यकर्ता मेळाव्यास सावकर मादनाईक , राजेंद्र गड्यान्नावर , वैभव कांबळे , जनार्दन पाटील , विठ्ठल मोरे , अजित पोवार , सचिन शिंदे , राजाराम देसाई, राम पाटील , पोपट मोरे यांच्यासह पदाधिकारी यांनी मनोगते व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक शैलेश आडके तर सुत्रसंचालन विक्रम पाटील यांनी केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800