पक्षाने संधी दिल्यास इचलकरंजीच्या सर्वांगीण विकास करणार-संजय कांबळे
इचलकरंजी
इचलकरंजी येथे संजय कांबळे युवा मंच व चौंडेश्वरी युवा फाउंडेशनच्या वतीने इचलकरंजी विधानसभेसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून संजय कांबळे यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योग, पाणीप्रश्न,क १ यासोबतच इचलकरंजी शहरालगतच्या कबनुर, चंदूर,तारदाळ,खोतवाडी,कोरोची या भागाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे मत संजय कांबळे यांनी व्यक्त केले.विधानसभा उमेदवारीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विरोधी पक्ष नेते बाळासाहेब थोरात,प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटलो असून विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे. ही विधानसभा निवडणूक पक्षाने तिकीट दिल्यास इचलकरंजी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीला बाबासाहेब कोतवाल यांनी स्वागत करताना काँग्रेस पक्षाकडे महाविकास आघाडीतून श्री संजय कांबळे यांना उमेदवारी द्यावी अशी रीतसर मागणी संजय कांबळे यांनी केली असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात प्रकाश सातपुते यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून संजय कांबळे यांना उमेदवारी देण्यात यावी त्यासाठी समाज म्हणून आम्ही तर पाठीशी राहूच पण शहरवासीयही सर्वसमावेशकतेसाठी पाठीशी राहतील अशी ग्वाही दिली.संतोष कांदेकर यांनी संजय कांबळे यांना उमेदवारी न मिळाल्यास वेगळा विचार करावा लागेल व संजय दादा सांगतील तो निर्णय अंतिम असेल असे मत व्यक्त केले.देवांग समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे यांनी संजय दादाना निवडून देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शितल दत्तवाडे यांनी गेली २० वर्षे विविध पदे जबाबदारीने पार पाडलेल्या दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण यांनी इंडिया आघाडीच्या वतीने जो कोणी उमेदवार निश्चित होईल त्याच्यासोबत ठामपणे राहणार असून संजय दादा कांबळे यांना संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रकाश मोरबाळे यांनी विद्यमान आमदारांनी चाळीस वर्षे झाले नेतृत्व केलेले आहे काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना विकासासाठी प्रवेश करत आहे असे सांगत असताना विद्यमान आमदारांनी शहराचा विकास करण्याऐवजी स्वतःचा विकास मात्र खूप चांगला केला असा टोला लगावला.रियाज चिकोडे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही संजय दादांच्या नावाची शिफारस केली असल्याचे सांगितले. सुहास जांभळे यांनी उमेदवारीसाठी महाविकास आघाडीतून पाच जण इच्छुक आहेत तरीपण सर्वांचे ध्येय्य एकच असल्याने भस्मासुर गाडण्यासाठी कोणालाही उमेदवारी मिळू दे त्यांच्या सोबत सर्वजण राहून त्यांना निवडून आणू असे मत व्यक्त केले. उदय बुगड यांनी मोदींचा चेहरा बघून धैर्यशील मानेंना लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी ४० हजाराचे मताधिक्य दिले असले तरी विधानसभेत चांगला चेहरा बघून उमेदवारी संजय कांबळे यांची असल्यास भारतीय जनता पार्टीचे नेते उघडपणे व्यासपीठावर येतील असे मत व्यक्त केले.
प्रमोद पाटील यांनी बंड केल्याशिवाय राजकारणात काही साध्य होत नाही त्यामुळे राजकारणामध्ये संजय कांबळे यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणू अशी घोषणा केली. सागर चाळके यांनी संजय कांबळे अजातशत्रू व्यक्तिमत्वअसून त्यांना निवडणूकीत संधी मिळाल्यावर आम्ही तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सोबत राहूच परंतु विरोधी पक्षातील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने तेही एक चांगला उमेदवार म्हणून पाठीशी राहतील.इचलकरंजीला भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नी ४० हजाराचे मताधिक्य निवडून गेल्यानंतर गेल्या चार महिन्यांमध्ये धैर्यशील माने यांनी ब्र शब्द सुद्धा काढला नाही.आमदार आवाडे यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करत आहोतच परंतु खासदारांची ही पाणीप्रश्नी काही जबाबदारी आहे का नाही असे मत व्यक्त केले. महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही याची जबाबदारी मी घेत असून वरिष्ठ जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला एकास एक लढत करून निवडून आणू अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी राजू आलासे,युवराज शिंगाडे,शिवाजी शिंदे,भाऊसो साखरे,शितल दत्तवाडे,प्रमोद मुसळे,विश्वनाथ मुसळे,चंद्रकांत शेळके,इरांण्णा सिंहासने,सुरेश भुते यांच्यासह संजय कांबळे युवा मंच व चौंडेश्वरी युथ फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800