७-१०-२०२४ ची करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई सरस्वतीच्या रूपातील पुजा
कोल्हापूर
आज अश्विन शुद्ध चतुर्थी शारदीय नवरात्र महोत्सवाचा पाचवा दिवस ज्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई सरस्वतीच्या रूपात सजली आहे सरस्वती या रूपाचा परिचय कुणा आस्तिक माणसाला नव्याने द्यायला लागत नाही. शुभ्र कमल त्यावरती शुभ्र वस्त्रा मध्ये विराजमान हातामध्ये अक्षर ब्रह्माचे प्रतीक म्हणून पोथी तर नादब्रह्माचे प्रतीक अशी विणा तर सातत्यपूर्ण अनुसंधानाचे प्रतीक म्हणून अक्षमाला अर्थात जपमाळा, धारण करणारी सरस्वती ज्ञानाची देवता आहे हे सर्वश्रुत आहेच. तीचे वाहन हंस म्हणजे नीरक्षीर विवेक बुद्धीचे प्रतीक अशा सरस्वतीला शारदा म्हणून ओळखले जाते शरदाच्या चांदण्या प्रमाणे शुभ्र अशी सरस्वती तुम्हा आम्हा सर्वांवर कृपा करो आणि आपली मती तिच्या चरणी स्थिर ठेवो हीच प्रार्थना
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्नसशक्तिकः
व्हिडीओ बघण्यासाठी क्लिक करा
https://youtu.be/g91bFwb-Zq0?si=Vkb5Z04OpHKz7giR

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800