बिल्डर्स असोशिएशनतर्फे बिल्डर्स डे उत्साहात साजरा
इचलकरंजी –
बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या वतीने बिल्डर्स डे मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला. बिल्डर्स डे चे औचित्य साधत बांधकाम क्षेत्रातील महत्वाचा घटक असणार्या रामजीवन जांगिड (उत्कृष्ठ सुतारकाम), महावीर चौधरी (उत्कृष्ठ फरशीकाम), संजय हेरवाडे (उत्कृष्ठ प्लंबिंगकाम), शिवभरण प्रजापती (उत्कृष्ठ पेंटींग काम), राजू काझी (उत्कृष्ठ सेंट्रींग काम), नागेश नायकर (उत्कृष्ठ गवंडीकाम) आणि वासुदेव वर्मा (उत्कृष्ठ पीओपी काम) या कारागिरींना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
बिल्डर्स डे निमित्त बी.ए.आय. (वेस्ट झोन) चे उपाध्यक्ष आनंद गुप्ता आणि बी.ए.आय.चे स्टेट चेअरमन अनिल सोनवणे, असो. चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भगवान देवकर, अविनाश पाटील, रणजित मोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कामगारांच्या कलागुणांना व कौशल्याला वाव आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी गुणवंत कामगार पुरस्कार दिले जातात. असा अभिनव उपक्रम महाराष्ट्रात केवळ बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या वतीने राबविला जात असल्याबद्दल आनंद गुप्ता व अनिल सोनवणे यांनी गौरवोद्गार काढले.
स्वागत बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे चेअरमन फैयाज गैबान यांनी तर बिल्डर्स असोशिएशन ऑफ इचलकरंजीचे चेअरमन नितीन धुत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नंदकुमार शहा यांनी केले. आभार सागर हिराणी यांनी मानले.
याप्रसंगी माजी स्टेट चेअरमन सचिन देशमुख, दत्तात्रय मुळे, रणधीर भोईटे, सुधीर घारगे, प्रताप साळुंखे, सुरेश पाटील, भोजराज निंबाळकर, प्रताप कोंडेकर, मदन भंडारी, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, डॉ. राहुल आवाडे, बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे व्हा. चेअरमन शितल काजवे, सेक्रेटरी राजेंद्र शिंत्रे, जॉ. सेक्रेटरी दिलीप पटेल, बिल्डर्स असोशिएशन ऑफ इचलकरंजीचे सेक्रेटरी रमेश मर्दा, जॉ. सेक्रेटरी तानाजी हराळे, ट्रेझरर पुंडलिक जाधव, महांतेश कोकळकी, सुहास अकिवाटे, राजेंद्र खंडेराजुरी, संजय रुग्गे, भगवान कांबुरे, संदीप टारे, पन्नालाल डाळ्या, शिवाजी पोवार, विकास चंगेडीया, प्रल्हाद माने, रामप्रसाद पाटील, ओमप्रकाश खंडेलवाल, श्रीकांत लास्कर, स्वप्निल शहा, मोहन सातपुते, विकास चंगेडीया, शिवकुमार हिराणी, राजेंद्र उपाध्ये, महेश महाजन, सुधीर लाटकर आदी उपस्थित होते.
फोटो – गुणवंत कामगारांना पुरस्कार प्रदान करताना आनंद गुप्ता, अनिल सोनवणे, भगवान देवकर, अविनाश पाटील, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नितीन धुत, फैयाज गैबान, रणजित मोरे, रमेश मर्दा, राजेंद्र शिंत्रे आदी मान्यवर.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800