लिजड् युनिट ऑफ श्री रेणुका शुगर्स लि.यांच्याकडून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास रुग्णवाहिका प्रदान.
इचलकरंजी ता.
प्रत्येक जीवनप्रवास हा जन्माकडून मृत्यूकडे असतो तर रुग्णवाहिकेतील रुग्णांचा प्रवास हा मृत्यू कडून जगण्याकडे असतो.लोकांनी सामाजिक जबाबदारीने भान ठेऊन रुग्णवाहिकेचा सायरन ऐकून रस्ता मोकळा करून दिला पाहिजे तरच हि आपली जीवनदायिनी रुग्णवाहिका महत्वाची कामगिरी बजावू शकतील आरोग्य व्यवस्थेचा एक मुख्य भाग म्हणजे उत्तम सुसज्ज आणि कधीही उपलब्ध असणारी रुग्णवाहिका. रुग्णांना घरून रुग्णालयात, एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविणे, आपत्कालीन वैद्यकीय सेवेत आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णालयाचे कामही ती करते हा विचार लक्षात घेऊन लिजड् युनिट ऑफ श्री रेणुका शुगर्स लि यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास रुग्णवाहिका प्रदान केली. आज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ नंदकुमार बनगे सर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.या वेळी रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800