पुरग्रस्तांचा प्रांत कार्यलयावर मोर्चा,सानुग्रह अनुदान न मिळाल्यास आमदार खासदार यांच्या घरावर्ती मोर्चा काढण्याचा इशारा-पैलवान अमृतमामा भोसले
इचलकरंजी
जुलै- ऑगस्ट महिन्यामध्ये आलेल्या महापुरामुळे नदी परिसरातील अनेक लोकांचे नुकसान झाले होते. यावेळी शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर केली. मात्र तरीसुद्धा अनेक पूरग्रस्तांपर्यंत ही मदत पोहोचू शकली नाही. अनेक पूरग्रस्तांची नावे यादीतून वगळली गेली.
सदर पूरग्रस्तांना तात्काळ अनुदान मिळावे, याबाबत मा. प्रांताधिकारीसो, इचलकरंजी यांना निवेदन देण्यात आले.जर येत्या २-३ दिवसात याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर आमदार खासदार यांच्या घरा वरती मोर्चा काढणार केला जाईल असे उपमहाराष्ट्रकेसरी पैलवान अमृतमामा भोसले व मा.नगरसेविका सौ. तेजश्री अमृत भोसले यांनी म्हटले आहे.
प्रांत कार्यालयावर काढलेल्या मोर्चावेळी ते बोलत होते,याबाबतचे निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले.
वेळी श्री तानाजी कोकीतकर,श्री आशीष पाटील, अण्णा सुतार,सतीश मिसाळ,रुपचंद पोळ,सागर संकपाळ,छाया शेळके, सो तेजस्विनी दरिबे, सौ छाया जाधव,अनिस म्हालदार, नितीन पडियार,सुरज अडेकर,तसेच दुर्गामाता गल्ली,शेळके मळा, अष्टविनायक कॉलनी,हणभर गल्ली,मरगुबाई मंदिर परिसर, मुजावर पट्टी या भागातील पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800