कॉ.के.एल.मलाबादे चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास मंजुरी.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरात कॉ.के.एल.मलाबादे चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा ११ फुटी पुर्णाकृती पुतळा बसवण्यास मंजुरी दिल्याची माहिती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
स्मारक समितीच्या अध्यक्षपदी गजानन महाजन गुरुजी,उपाध्यक्षपदी अरविंद माने,सचिव पदी प्रसाद जाधव तर खजिनदार पदी युवराज बोने पाटील यांची निवड करण्यात आली.
महाजन गुरुजी बोलताना म्हणाले यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता.लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाप्रसंगी संभाजी भिडे गुरुजी यांनी मुख्यमंत्री महोदयांची विमानतळावर भेट घेतली असता तेथे हा मुद्दा मांडण्यात आल्यावर त्यांच्या सूचनेनुसार स्मारक समितीची स्थापना करण्यात आली व पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या पुतळा समितीने आज त्यास मंजुरी दिली आहे.याकामी आ.प्रकाश आवाडे,खासदार धैर्यशील माने, राहुल आवाडे,रवींद्र माने,महापालिका आयुक्त यांचे सहकार्य लाभल्याचे यावेळी समितीतर्फे सांगण्यात आले.
इचलकरंजीत होणारा पुतळा हा महाराष्ट्रात आदर्शवत असेल,महापालिकेने प्रशासकीय ठराव करून दिला असून इतर संबंधित सर्व खात्यांचा ना हरकत दाखला घेऊन ही मंजुरी प्रक्रिया झाल्याचे सदस्य मंगेश मस्कर यांनी सांगितले.
यावेळी यासाठी लागणार निधी शासनाकडून मिळणार असून स्मारक समितीच्या देखरेखीत हे कार्य पूर्ण होणार आहे असे उपाध्यक्ष अरविंद माने यांनी सांगितले.यावेळी स्मारक समितीचे प्रसाद जाधव,संतोष सावंत,युवराज बोने पाटील,सुनील इंगळे,सतीश घोरपडे,समीर मुदगल,अभिनव सुतार,महेश जाधव उपस्थित होते.
कॉ के एल मलाबादे चौकाचे अस्तित्व अबाधित.
इचलकरंजी शहरासाठी मोठ्या प्रमाणात कॉ के एल मलाबादे यांचे योगदान आहे ते कोणीही नाकारू शकत नाही त्यामुळे चौकाचे अस्तित्व अबाधित ठेवून असलेल्या गोलाकार जागेत पुतळा बसवण्यात येणार असल्याचे समिती सदस्यांनी स्पष्ट केले.
मलाबादे चौकात पुतळा बसवण्यास विरोध-सदा मलाबादे.
छत्रपती संभाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहेत.गजबजलेल्या मलाबादे चौकात पुतळा बसवण्यास आमचा विरोध असुन तो संभाजी चौकात अथवा शहापूर येथे बसवण्यात यावा हीच आमची मागणी कायम असून याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सदा मलाबादे यांनी सांगितले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800