सागर चाळके यांची खासदारांवरील टीका जबाबदारीची जाणीव करून देणारी-प्रकाश मोरबाळे
इचलकरंजी
इचलकरंजी शहराचा गंभीर पाणीप्रश्नी जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी सागर चाळके यांनी खासदार मानेंवर टिप्पणी केली असल्याबाबतचे पत्रक माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी काढले आहे.
इचलकरंजी लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार श्री. धैर्यशिल माने हे सन २०१९ पासून या मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांना शहराच्या मूलभूत प्रश्नाची जाण आहे. निवडणूकीमध्ये दिलेली आश्वासने ती पुर्ण करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे कर्तव्य व जबाबदारी आहे. कोणताही लोकप्रतिनिधी जनतेवर उपकार करीत नाही आणि जर का त्यांनी केलेले काम म्हणजे उपकार करीत आहेत असे वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे.इचलकरंजी जनतेने त्यांना २ वेळा खासदार केले त्यांनी मतदारांचे आभार मानले पाहिजे भारत स्वातंत्र्यानंतर अनेक राजकीय सामाजिक व्यक्तीनी गावाचा / देशाचा विकासाचे ध्येय समोर ठेवून राजकारण केले आहे त्यामुळे धैर्यशिल माने यांनी घरावर तुळशीपत्र ठेवले असे म्हणता येणार नाही. श्री. सागर चाळके हे माने यांचे राजकीय स्पर्धक नाहीत. संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे गावांच्या समस्या लोकप्रतिनिधीच्या निर्दशनास आणणे लोकप्रतिनिधीनी दिलेली आश्वासने याची पुर्तता केली नाहीतर प्रत्येक नागरीकांचे लोकप्रतिनिधीना जाब विचारणे हे प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य आहे. श्री. भाऊसो आवळे हे हुशार व बुध्दीमान व्यक्तीला समजत नाही यांचे आश्चर्य वाटते. त्यांच्या धर्मपत्नी सौ. सरीता भाऊसो आवळे यांना इचलकरंजी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री. सागर चाळके यांनीच केले होते ते पद खा. धैर्यशिल माने यांनी दिलेले नव्हते. इचलकरंजी शहरांचा पाणीप्रश्न गंभीर आहे त्यासाठी गावातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरीक सातत्याने लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. निवणूकीपुर्वी मा. मुख्यमंत्री यांनी बैठक घेवून शहरातील पाणीप्रश्ना संदर्भात १ महिन्यात अहवाल द्यावा असे आदेश दिले होते.परंतु आजरोजी कोणतीही कारवाई झालेली नाही. ही बाब जनतेच्या निर्देशनास श्री. चाळके यांनी आणली म्हणजे गुन्हा केला काय ? यामध्ये एवढे वैफल्यग्रस्त होण्याचे कारण काय या शहरातील मतदारांनी ४०,००० चे मताधिक्य दिलेले आहे. तो त्यांचा भ्रम आहे. कारण व्यापारी, कारखानदार व सर्व सामान्य महिला यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा बघून मतदान केलेले आहे. तसेच यामध्ये या शहराचे विद्यमान आमदार श्री. प्रकाश आवाडे यांचाही श्री. माने यांना निवडून आणणेत मोठा वाटा आहे. श्री. धैर्यशिल माने यांनी मी स्वकर्तत्वार निवडूण आलो असे जर त्यांना वाटत असले तर तो त्यांचा भ्रम आहे. त्यांनी अपक्ष म्हणून जर निवडणूक लढवली तर त्यांना ज्या मतदारांनी १,१०,००० मते दिलेली आहेत त्यापैकी १०,००० ही मते पडणार नाहीत. टिका करणे हा प्रत्येक नागरीकांचा संविधानिक अधिकार आहे त्यामुळे याबाबत वेगळा विचार करणेची श्री. चाळके यांना आवश्यकता नाही यांची संबंधीतानी नोंद घ्यावी असेही मोरबाळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800