इचलकरंजी संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत २३०० लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर – अँड अनिल डाळ्या
इचलकरंजी
संजय गांधी निराधार अनुदान समितीची बैठक गुरुवार दिनांक १० ऑक्टोंबर रोजी समितीचे अध्यक्ष एडवोकेट अनिल डाळ्या यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी कार्यालय इचलकरंजी येथे पार पडली .यावेळी समिती पुढे संजय गांधी सर्वसाधारण निराधार योजनेची ४६० अर्ज व व श्रावण बाळ योजनेची १८२० अर्ज व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ विधवा अपंग निवृत्तीवेतन योजनेची ११५ अर्ज असे एकूण २३९५ अर्ज समिती पुढे ठेवण्यात आले .या अर्जापैकी जवळजवळ २३०० अर्जांना मंजुरी देण्यात आली व उर्वरित प्रकरणातील त्रुटी पूर्ण करून ती प्रकरणी पुढील मीटिंगमध्ये सादर करण्याचे ठरले. महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीमुळे आचारसंहिता लागणार आहे हे ध्यानात ठेवून समिती अध्यक्ष अनिल डाळ्या व त्यांच्या समितीने आचारसंहितेच्या दोन चार दिवस अगोदरच ही मीटिंग घेण्यात आली .या मीटिंगसाठी संजय गांधी समिती सचिव व इचलकरंजीचे अप्पर तहसीलदार श्री सुनील शेरखाने साहेब तसेच संजय गांधी चे प्रभारी नायब तहसीलदार सौ सुरेखा पोळ मॅडम तसेच संजय गांधी समितीचे सदस्य सुखदेव माळकरी, कोंडीबा दवडते, संजय नागोरे ,तमन्ना कोटगी, जयप्रकाश भगत, सलीम मुजावर ,सौ सरिता आवळे हे सर्व सदस्य उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800