इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी तर्फे दिनांक १८-१९ ऑक्टोबरला शॉपिंग एक्स्पोचे आयोजन.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी तर्फे दिनांक १८-१९ ऑक्टोबरला शॉपिंग एक्स्पोचे आयोजन.
इचलकरंजी
इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी तर्फे गेली २८ वर्षे महिला महोत्सव हा उपक्रम राबवला जातो. यावर्षी सुद्धा हा शॉपिंग एक्सपो दिनांक १९ व १९ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत अध्यक्षा चंदा कोठारी व प्रोजेक्ट चेअरमन सुनीता उरूणकर यांनी दिली.क्लबबाबत माहिती देताना वैशाली लोखंडे यांनी क्लब ०१४ देशात कार्यरत असुन जगभरातील १.२५ लाख महिला तर भारतात ५७ हजार महिला सभासद आहेत.भारतात २७ डिस्ट्रिक्ट असून आपल्या भागात T १७ डिस्ट्रिक्ट अंडर महाराष्ट्रातील काही जिल्हे,उत्तर कर्नाटक व गोवा हा भाग येत असून यामध्ये ३२०० सभासद आहेत.विविध सामाजिक उपक्रमाबरोबर १०० शिलाई मशीन,१०० डिजिटल चेअरचे वाटप केले असल्याचे सांगितले.ट्रेजरर हर्षदा मराठे यांनी यातून येणाऱ्या रक्कमेतून कानाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात ३ दिवसाच्या कॅम्पमध्ये साधारण ६० जणांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्यासाठी ३ लाख रुपये खर्च येतो.तसेच विविध सामाजिक उपक्रमातून प्लॅस्टिक सर्जरी,गरजू मुली दत्तक,व्हिलचेअर व तीनचाकी सायकल गरजूना दिल्या जातात असे सांगितले.सीमा उरूणकर यांनी सुरवातीला स्वतः स्टॉल व कुकिंग क्लास घेऊन उपक्रम चालवला असून सध्या आकर्षक स्टॉल बांधणी,स्टॉल धारकांच्या सोयी,शिस्तबद्धता आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यामुळे या उपक्रमाची सर्वानाच उत्सुकता असते.या शॉपिंग एक्स्पोमुळे अनेक घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना खुले व्यासपीठ मिळते,त्यांचा आत्मविश्वास वाढतो,तसेच त्यांना आर्थिक बळही मिळते.येणाऱ्या नागरिकांनाही एकाच छताखाली अनेक वस्तू मिळत असल्याने समाधान मिळते.या उपक्रमातून मिळणाऱ्या धनराशीमुळे आमची इनरव्हीलसारखी सामाजिक कार्य करणारी संस्था गरजूंसाठी अनेक वैद्यकीय उपक्रम राबवू शकते.कानाचे ऑपरेशन सारखा अत्यंत गरजेचा आणि महत्त्वाचा उपक्रम आम्ही घेऊ शकतो.शिवाय नगरपालिकेच्या शाळांमध्ये टॉयलेट, हॅडवॉश स्टेशन,रंगरंगोटी,स्वच्छता, लायब्ररी,खेळाचे साहित्य अशा सोयी उपलब्ध करून देऊन हॅप्पी स्कुल बनवू शकतो.अशा प्रकारे सर्वसामान्य मुलांना चांगल्या शिक्षणाची सोय देऊन त्यांचे शैक्षणिक जीवन आनंददायी बनवण्यासाठी क्लब प्रयत्नशील असतो.
हा शॉपिंग एक्स्पो  यशस्वी करण्याकरता आमच्या क्लबचे सर्व सदस्य दिवस- रात्र झटत असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने यात सहभागी होत असतो.आमच्या एकसंघ विचारांमुळे या उपक्रमाच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. अशा या आमच्या यशस्वी महोत्सवाबद्दल नेहमीच स्टॉल धारकांची समोरून विचारणा होत असते. यावर्षी हा शॉपिंग एक्सपो १८-१९ ऑक्टोबर रोजी अग्रसेन भवन येथे घेण्यात येणार आहे. सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू राहील. येथे इचलकरंजी, पुणे, सांगली, मिरज, कोल्हापूर, जयसिंगपूर, तासगाव, हैदराबाद या ठिकाणाहून विविध प्रकारचे असे ६७ स्टॉल आहेत.दोन्ही दिवस भरघोस लकी ड्रॉ,स्पॉट गेम्स असणार आहेत.या व्यतिरिक्त रिल तयार करणे, रांगोळी काढणे, फुलांचे तोरण बनवणे,करंजी करणे या स्पर्धाही आयोजित केल्या आहेत. तेव्हा सर्वानी या शॉपिंग एक्सपोला भेट देऊन भरघोस खरेदीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.यावेळी छाया भुतडा,प्रेमलता सारडा,सपना शहा,स्मिता कुलकर्णी, स्नेहा मराठे आदि पदाधिकारी उपस्थित होत्या.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More