करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपातील पूजा
आज शारदीय नवरात्र महोत्सवाचा नववा दिवस पण तिथी अष्टमी . आजच्या तिथीला जगदंबेने अष्टादशभूजा म्हणजे १८ हातांचे विराट रूप धारण करून महिषासुराचा वध केला होता. त्याची स्मृती म्हणून दरवर्षी नवरात्र महाष्टमीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधली जाते आज या पूजेत जगदंबे थोडसं वेगळं रूप साकारण्यात आला आहे महिषोत्तमांग संस्थिता म्हणजे महिषासुराचे उत्तम अंग अर्थात त्याचे मस्तक त्याच्यावर विराजमान असं हे जगदंबेच महिषासुराच्या मस्तकावर पाय रोवून उभी राहिलेली सर्व देव वरदायिनी अशी जगदंबा आज साकारण्यात आली आहे करवीर शक्तिपीठ देवता म्हणून महिष मर्दिनी या देवतेचा उल्लेख येतो 51 शक्तिपीठाच्या यादीत कोल्हापूरला सतीचे त्रिनेत्र पडले व तिथे महिषमर्दिनी नावाने देवी आणि क्रोधीश भैरव नावाने भैरव विराजमान असल्याचे सांगितले जाते. करवीरची शक्तीपीठ देवता अर्थात अंबाबाई मंदिरातील महाकाली जी चतुर्भुजा महिषासुरमर्दिनी रुपात विराजमान आहे तिच्यासमोर आज रात्री महाष्टमी होम केला जाईल.
आई आदिशक्ती आज रात्री नगर प्रदक्षिणेला बाहेर पडेल सर्व भक्तांवर कृपा करणारी जगदंबा सदोदित आपणास सर्वांवरती अशीच मायेची पाखर घालो हीच तिच्या चरणी विनम्र प्रार्थना.
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्नसशक्तिकः
व्हिडीओ साठी क्लिक करा
https://youtu.be/SqkxrMNEQko?si=Qd4rwptHr_pXQLO1

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800