राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज इचलकरंजीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे करणार मार्गदर्शन.
इचलकरंजी
महायुती सरकारच्या काळ्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या
विचारांचे सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली शिवस्वराज्य यात्रा आज मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी इचलकरंजीत येत आहे. ही यात्रा दुपारी १.३० वाजता शिवतीर्थ येथून सुरू होणार आहे.मोटारसायकल रॅलीने शिवतीर्थ येथून के.एल.मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा मार्गे नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह येथे जाहीर सभा होणार आहे.
शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा विचाराचा स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्यासाठी, सामाजिक न्याय हक्क प्रस्थापित करण्यासाठी, गद्दारांना धडा शिकवण्यासाठी, महाराष्ट्राचे उज्वल भविष्य, महिला सुरक्षा सुरक्षित ठेवण्यासह बेरोजगारांना न्याय देण्यासाठी आणि रयतेच्या मनातील शिवस्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शिलेदारांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य मा. मदन कारंडे व शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.
१९९५ ते १९९९ युती सरकारच्या काळात जशी तिजोरी रिकामी करण्यात आली तशीच आता सध्या परिस्थिती झाली आहे,सरकारी तिजोरीचा गैरवापर करण्यात येत असुन महाराष्ट्राचे ९ वर्षे बजेट मांडलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे याबाबत विश्लेषण करतील तर धर्मवादाबाबत संसदरत्न खासदार अमोल कोल्हे मार्गदर्शन करणार असल्याचे मदन कारंडे यांनी सांगितले.
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांना वाय सुरक्षा असताना गोळीबार करण्यात आला त्यांच्या मृत्यूस सामोरे जावे लागले याचा निषेध पक्षातर्फे उदयसिंग पाटील यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात मदन कारंडे,सुहास जांभळे,उदयसिंग पाटील,अब्राहम आवळे,अभिजित रवंदे,दशरथ माने आणि नागेश शेजाळे उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800