शहरातील स्ट्रीट लाईट बंद,गैरप्रकाराणा चालना-उमाकांत दाभोळे
इचलकरंजी
इचलकरंजी शहरात स्ट्रीट लाईट बंद असून शहराची दिवाबत्ती कुणाच्या भरोसे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते उमाकांत दाभोळे यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांना केला आहे.
स्ट्रीट लाईटची सद्यस्थितीत होणारी गैरसोय बघता मक्तेदार महापालिकाचा जावई आहे काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
लाईट विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना पण तक्रारी आहेत कामा बाबतीत संबंधित मक्तेदार त्यांना जुमानत नाही असे चित्र आहे.
शहरातील स्ट्रीट लाईट बद्दल तक्रारीमध्ये प्रचंड वाढ होत आहे पाच सहा दिवस तक्रारी कडे दुर्लक्ष केले जाते तक्रार डायरी मध्ये नागरिकांनी केलेल्या तक्रारी वर खोटा शेरा मारून तक्रार निवारण केल्याची नोंद केली जाते
इचलकरंजी शहरामध्ये कित्येक दिवस भागातील स्ट्रीट लाईट डांबावरील दिवे बंद आहेत.पहाटे फिरायला महिला वर्गात भीतीची वातावरण आहे किती वेळा पहाटे फिरायला जाणाऱ्या महिलाचे हिसडा मारुन दागिने चोरीचे प्रकार घडलेले आहेत तसेच भागात गाडीतील पेट्रोल चोरीला जाणे गृह उपयोगी वस्तू चोरीला जाणे असे प्रकार अंधारात घडत असतात तसेच अंधाराचा फायदा घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू शकतात.
तरी महापालिका प्रशासन अधिकारी संबंधित मक्तेदाराच्या लाईट देखभाल दुरुस्ती कामाची समीक्षा करणे गरजेचे आहे प्राधान्याने या कामाची समीक्षा करावी व नागरिकांना नाहक त्रासापासून दिलासा द्यावा व कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याकडे लक्ष द्यावे अशी मागणी उमाकांत दाभोळे यांनी केली आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800