कन्या महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात संपन्न.
इचलकरंजी
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभाग आणि इतिहास विभागामार्फत वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणून 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.
यंदा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्त्रोत केंद्रामार्फत या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन असणाऱ्या मजकुराचे वाचन करून हा दिवस साजरा करावा,असे आव्हान करण्यात आले होते, त्याला अनुसरून महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे अध्यक्षस्थानी होते, त्यांनी विद्यार्थिनींना आपल्या आयुष्यातील वाचनाचे महत्त्व विविध लेखकांची उदाहरणे देऊन पटवून दिले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये वाचन ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थिनींनी विविध विषयांवरच्या कथा,कादंबऱ्या आणि लेखांचे वाचन केले पाहिजे,असे ते म्हणाले.इतिहास विभाग प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन सर्व विद्यार्थिनींना वाचून दाखवले.या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन ग्रंथालय विभाग प्रमुख मिनाज नायकवडी यांनी केले.या कार्यक्रमाचे आभार प्रा.संगीता पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी कन्या महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800