यंत्रमागधारकांनी बिमाची व बाचक्याची वाहतूक करू नये-पॉवरलूम असोसिएशन
इचलकरंजी
यंत्रमाग कारखानदारांनी सायझींगवरील बिमांची व बाचक्यांची वाहतूक करू नये असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
नुकताच सायझींग असोसिएशनने दिवाळीनंतर बिमांची व बाचक्यांची ने व आण करखानदारांनी स्वत: करावा असा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने सायझींग असोसिएशनला पत्र दिले आहे. सदर पत्रामध्ये आपण दिलेल्या जाहिराततीमध्ये दिवाळीनंतर बिमांची व बाचक्यांची ने व आण करखानदारांनी स्वत: करणेची आहे अशा अशयाचा मजकुर देणेत आला आहे. यासंदर्भात आपण कारखानदारांची प्रातिनिधीक संस्था दि इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप. असोसिएशनशी असा कोणताही पत्र व्यवहार अथवा विचार विमर्ष न करता निर्णय घेतलेला आहे. तो इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाला मारक व अव्यवहार्य असा आहे. त्यामुळे कोणताही कारखानदार स्वत: बिमांची व बाचक्यांची वाहतूक करणार नाहीत असे पत्रातून कळविले आहे.
इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाची परंपरा १२० वर्षांची आहे. या १२० वर्षामध्ये सायझींग बिमे आणणे व भरून पाठविणे, बाचकी आणणे, खरड पोहचविणेची जबाबदारी सायझींगची आहे. आणि ती व्यवहारीकदृष्ट्या व व्यवसायाच्या दृष्टीने योग्य व बरोबर आहे. जरी गेल्या काही महिन्यामध्ये टेम्पोमधील बिमांमुळे कांही अपघात झाले असले तरी टेम्पोधारक व हमालांना याबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. गेल्या १२० वर्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच अपघात झालेले आहेत. अपघात होणे व त्यातून नागरिकांना दुखापत होणे अथवा एखाद्याचे निधन होणे याचे समर्थन करता येणार नाही. पण म्हणून गेल्या १२० वर्षांची व्यवस्था बंद करून वाहतुकीचे नियोजन कारखानदारांवर ढकलणे व्यवहारीक नाही. व्यवसायाच्या दृष्टीने बाचकी गोडावूनमधून उचलणे, मोकळी बिमे उचलणे व बिमे भरून झालेनंतर पोहचविणे याचे नियोजन व वेळापत्रक सायझींग मालकांनी करणे योग्य आहे.
गेल्या ४ ते ५ वर्षांमध्ये यंत्रमाग उद्योग अत्यंत खडतर प्रवासातून सुरू आहे. त्यातच रशिया – युक्रेन व इस्त्रााईल – पॅलेस्टाईन – लेबनॉन युद्ध यामुळे वस्त्रोद्योगामध्ये जागतिक मंदीचे वातावरण आहे. यातच अशा प्रकारचा निर्णय यंत्रमाग उद्योगासाठी व सायझींग उद्योगासाठी मारक होणार आहे. त्यामुळे बिमांची ने आन करणेच्या व्यवस्थेमध्ये कोणताही बदल कोणत्याही परिस्थितीत होणार नाही असे नमुद केले आहे.
तसेच यंत्रमाग कारखानदारांनी सायझींगवरील बिमांची व बाचक्यांची वाहतूक स्वत: कोणत्याही परिस्थितीत करणेची नाही. यासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास किंवा सायझींगधारकांनी वाहतूक करणेस सांगितलेस दि इचकरंजी पॉवरलुम असोसिएशनशी संपर्क करावा असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800