हातकणंगले लोकसभा मतदार संघात निवडणुकीची तयारी सुरू,प्रशासन सज्ज-मोसमी बर्डे चौगुले.
इचलकरंजी
इचलकरंजी विधानसभा मतदार संघ क्र.२७९ मध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या तयारीची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. १५ तारखेला दुपारी आचारसंहिता लागली असून त्या अनुषंगाने विधानसभा मतदारसंघांमध्ये इचलकरंजी विधानसभेतंर्गत निवडणुकीच्या तयारीची माहिती देताना इचलकरंजी शहरांमध्ये २० नोव्हेंबरला मतदान होणार असून त्यासाठी भरारी पथकांतर्गत ४ कर्मचाऱ्यांची पथके नेमली आहेत. आचारसंहिता उल्लंघन बाबतच्या ज्या तक्रारी असतील त्या सीव्हिजिल या ॲपवर नागरिकांनी कराव्यात शंभर मिनिटांमध्ये तेथे पोहोचून त्याची शहानिशा करून पुढील कारवाई सुरू केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदारसंघांमध्ये २५४ आधीचे नविन १२ मतदान केंद्र व एक अतिरिक्त असे २६७ मतदान केंद्र असून त्यापैकी ६३ ग्रामीण व २०४ शहरी मतदार केंद्र आहेत.येथून पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली जाणार आहे ३० ऑगस्ट पर्यत ६० तृतीयपंथी यांच्यासह ३,०६,००५ जनरल मतदार असून १५९ सैनिक मतदान असे २,९७,०७७ एकूण मतदार आहेत.१,५५,९१६ पुरुष तर १,५०,०२९ महिला मतदार आहेत.१५ ऑक्टोबर पर्यत ३८७२ नवमतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त असून त्यांची छाननी केली जाणार आहे.
इचलकरंजी शहरात पंचगंगा नदी नाका,कबनुर नाका,यड्राव नाका, कोरोची नाका येथे एकूण आठ तपासणी पथके नियुक्त केली आहेत.८५ वर्षे पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना तसेच ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्या दिव्यांगांना १२ डी फॉर्म भरल्यावर पोस्टल बॅलेट ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून आमचे बीएलओ दोन वेळा त्यांच्याकडे जातील ही प्रक्रिया मतदानाआगोदर तीन दिवसापासून सुरू होईल पोस्टल बॅलेटने मतदान घेतले जाईल दोन वेळा त्यांना सूचना देऊन जर त्यांनी मतदान केले नाही तर त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. ८५ पेक्षा जास्त मतदान असलेले १९७२ तर दिव्यांग ५४४ मतदार आहेत.
नागरिकांनी आपली नावे मतदान यादी चेक करावी व लोकशाहीच्या उत्सवात सामील व्हावे अशी ही माहिती त्यांनी दिली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त प्रसाद काटकर,अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने उपस्थित होते.
नविन मतदार नोंदणीसाठी ६ नंबर फॉर्म १८ तारखेपर्यत भरण्याची मुदत.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात नवीन मतदार नोंदणीचा ६ नंबर फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरण्याची मुदत १८ ऑक्टोबर पर्यत असून अजूनही त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
चौकट- निवडणूक आयोगाने सीव्हिजिल मोबाईल अँप काढले असून त्यामध्ये फोटो,व्हिडीओ,ऑडिओ स्वरूपात आदर्श आचारसंहिता भंगची तक्रार दाखल करण्याची सुविधा आहे.याबाबत तक्रार दाखल झाल्यावर भरारी पथक तेथे पोहोचून १०० मिनिटात पुढील कारवाई करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी यांनी दिली तरी नागरिकांनी याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात केल्यास गैरप्रकार रोखण्यास मदत होणार आहे

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800