कल्याणकारी मंडळ टिकवण्यासाठी आता एकजुटीची गरज – कॉ शिवगोडा खोत वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी-
गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे शासनाला वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे लागले आता ते टिकवण्यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांची एकजूट गरजेची आहे असे मत पुरोगमी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शिवगोडा खोत यांनी वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सरकारने कल्याणकारी मंडळ स्थापन केल्याने या व्यवसायाला स्थिरता मिळाली असून भविष्यात या मंडळाच्या माध्यमातून या व्यवसायात कार्यरत असनार्या सर्वाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत व हा व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे.
यावेळी आण्णा गुंडे म्हणाले आजचा हा वृत्तपत्र विक्रेता दिन फार महत्वाचा असून कारण कल्याणकारी मंडळ स्थापन झाल्यानंतरचा हा पहिला वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा होत आहे सरकारने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले व यासाठी सुमारे 100 कोटी ची तरतूद केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले व आभार मानले तसेच संघटनेचे सभासद व पत्रकार संतोष पाटील यांना पुणे न्यूज एक्सप्रेस च्या वतीने सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाला त्यानिमीत्य त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
वृत्तपत्र विक्रेता दिना निमित्त संघटनेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या फोटो पूजन करण्यात आले व फटाक्यांची आतीषबाजी व खाऊ वाटप करण्यात आला तर संघटनेच्या कार्यालयाची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
यावेळी सर्व वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीनी वृत्तपत्र विक्रेत्यांना पेढे वाटून वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या
यावेळी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह वृत्तपत्र विक्रेत्ये मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते .

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800