अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थिनींनी घेतला प्रबोधनाचा वसा.
इचलकरंजी
येथील श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि समाजवादी प्रबोधिनी यांच्यामध्ये असणाऱ्या MOU अंतर्गत अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थिनींनी समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधिनीच्या ग्रंथालयाला भेट दिली.
वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींच्या मधील वाचक जागा झाला पाहिजे, त्यांना वाचनाची सवय लागावी, या हेतूने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रो.डॉ.त्रिशला कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यामध्ये समाजवादी प्रबोधिनी ग्रंथालयास भेट देण्यात आली. समाजवादी प्रबोधिनीच्या स्थापनेचा उद्देश, आजपर्यंतचा इतिहास, त्यांचे आजपर्यंतचे कार्य यांची संपूर्ण माहिती मा.प्रसाद कुलकर्णी सर यांनी दिली.
सोबत प्रा.संभाजी निकम,प्रा. गिरीश झुरळे , प्रा. वारंग आणि B.A. भाग ३ मधील अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यिनी उपस्थित होत्या.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800