इचलकरंजीत इनरव्हील क्लब तर्फे शॉपिंग एक्सपो २०२४ चे उद्घाटन संपन्न.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत इनरव्हील क्लब तर्फे शॉपिंग एक्सपो २०२४ चे उद्घाटन संपन्न.
इचलकरंजी
          इचलकरंजी येथील इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी गेली २५ वर्षे सातत्याने महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला महोत्सव चे आयोजन करीत असते .यावर्षी शॉपिंग एक्सपो २०२४ च्या माध्यमातून महिलांना महिलांच्या कलेला व त्यांच्या व्यवसाय वाढीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले आहे असे  उद्ग गार सौ .मौसमी आवाडे यांनी काढले .इनरव्हील क्लबच्या वतीने अग्रसेन भवन इचलकरंजी येथे हे प्रदर्शन दिनांक १८ व १९ ऑक्टोबर २२०४ रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी मोसमी आवाडे बोलत होत्या .इनरव्हील क्लब ने यावर्षी शॉपिंग एक्सपो २०२४  च्या माध्यमातून विविध स्टॉलचे प्रदर्शन आयोजन केले आहे .यामध्ये ७० स्टॉल्स सुबक पद्धतीने मांडण्यात आले आहेत .दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाची खरेदीची गरज या माध्यमातून पूर्ण होणार आहे.सर्व प्रकारच्या वस्तूंची एकत्रित खरेदी करण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्ताने शहरवासीयांना उपलब्ध झाली आहे.या महोत्सवात शॉपिंग एक्सपोमध्ये अनेक नामांकित कंपन्यांचे स्टॉल्स आहेत.यामध्ये ज्वेलरी, होम डेकोर, दिवाळी फराळ, मोबाईल कव्हर,ड्रेसेस साड्या भगवान पोशाख,पर्सेस, बास्केट्स हर्बल प्रोडक्ट,केक डोनेटस, ड्रायफूट,फूड आययटम , शिलाई मशीन,मायक्रो ओवन,इलेक्ट्रॉनिक वस्तू,इमिटेशन ,साड्या, सोफा कव्हर्स, फॅन्सी  बॅग इत्यादी अनेक स्टॉल्स मांडण्यात आले आहेत .या दरम्यान दर एक तासाने लकी ड्रॉ व स्पॉट गेम्स बक्षीसे व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच तीन बंपर लकी ड्रॉ निघणार आहेत .यामध्ये फॉर्च्यून हॉटेलमध्ये एक दिवसाचा स्टे व त्याबरोबर दोन पिक्चर चे तिकीटही देण्यात येणार आहेत .
           उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात स्वागत इनरव्हील क्लबचे अध्यक्ष  सौ .चंदा कोठारी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन सौ सीमा उरुणकर यांनी केले. यावेळी डिस्ट्रिक्ट ट्रेझरर सो. हर्षदा मराठे यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले .दोन गरजू दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर प्रधान पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. क्लबच्या एडिटर सौ.  विभा जैन  यांनी संपादित केलेल्या सुरभी बुलेटिनचे प्रकाशन सौ मौसमी आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. शेवटी आभार इव्हेंट को -चेअरमन सौ सपना शहा यांनी  मानले .व्यासपीठावर क्लबच्या सेक्रेटरी सौ. प्रेम लता सारडा ,सौ. अर्चना मानधनिया, सौ. छाया भुतडा ,सौ राखी बांगड, उपस्थित होत्या ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .मीनाक्षी तंगडी यांनी केले कार्यक्रमा वेळी डी जी इ रोटेरियन अरुण भंडारे, संतोष पाटील, राजेंद्र कोठारी ,संजय उरुणकर ,संतोष शहा ,इनरव्हील क्लबच्या   प्रेसिडेंट ,मेंबर्स महिला मंडळाच्या पदाधिकारी ,निमंत्रित स्टॉलधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More