इचलकरंजी शहरात दिवाळीमध्ये फटाके विक्री स्टॉलसाठी किसनराव आवळे मैदान येथेच परवानगी देण्यात येणार:-
आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे
इचलकरंजी
इचलकरंजी शहरात दिवाळीमध्ये श्री शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर मोठा बाजार भरतो.
दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी एका दुकानास आग लागल्याची दुर्घटना घडली होती.सदर आग लागलेल्या ठिकाणी आग विझविण्यासाठी अग्निशमन वाहन जाणेसाठी सुद्धा रस्ता उपलब्ध झालेला नव्हता.
या अनुषंगाणे पोलिस निरिक्षक इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांचेकडून पत्राद्वारे याबाबत नियोजन करणेची मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे केली होती.
सदर मागणीस अनुसरून याविषयी विचार विनिमय करणेसाठी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका उपायुक्त, महानगरपालिकेचे सर्व संबंधित विभाग प्रमुख आणि शहरातील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचे समवेत बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीत दिवाळीमध्ये मुख्य रस्त्यावर भरत असलेला बाजार आणि शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेले फटाके विक्री स्टॉल याविषयी सर्वंकष चर्चा करणेत आली.
सदर बैठकीमध्ये फटाके विक्री स्टॉल उभारण्यासाठी शहरातील किसनराव आवळे मैदान येथे जागा निश्चित करणेत आली.शहरात इतरत्र कोठेही फटका स्टॉल उभारण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही आणि जर कोणी किसनराव आवळे मैदान व्यतिरिक्त इतर ठिकाणी विनापरवाना फटाके विक्री स्टॉल सुरू करतील त्यांचेवर महानगर पालिका आणि पोलिस प्रशासन यांचेकडून कडक कारवाई करणेचा निर्णय घेणेत आलेला आहे.
त्याचबरोबर श्री शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर एका बाजूला ११ फुट रुंदीचे बॅरिकेड्स लावून सदर रस्ता अग्निशमन वाहन अथवा रुग्णवाहिका या अत्यावश्यक वाहतूकीसाठी सुरू ठेवणे बाबतचा निर्णय घेणेत आला आहे. या बॅरिकेड्स लावलेल्या ठिकाणी जर विक्रेत्यांनी स्टॉल लावल्यास त्यांचेवर सुद्धा कडक कारवाई करणेत येणार आहे.
तरी सदर निर्णयाचे सर्व
विक्रेत्यांनी पालन करावे आणि कारवाई सारखे कटु प्रसंग टाळावेत असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश यांचेकडून करणेत येत आहे.
या बैठकीस उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त सोमनाथ आढाव, सहा. आयुक्त विजय कावळे, सहा. आयुक्त रोशनी गोडे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार,सहा.संचालक नगररचना प्रशांत भोसले, पोलिस निरिक्षक शिवाजीनगर सचिन पाटील, पोलिस निरिक्षक शहापूर सचिन सुर्यवंशी, सहा.पोलिस निरीक्षक विजय गोडसे, मिळकत पर्यवेक्षक श्रीकांत पाटील, सहा.पोलिस उपनिरीक्षक संदीप कांबळे, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, सदाशिव गोनुगडे, आपत्ती व्यवस्थापनाचे संजय कांबळे आदी उपस्थित होते

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800