आपटे वाचन मंदिराच्यावतीने महानगरपालिकाच्या शाळांमध्ये फिरते ग्रंथालय
इचलकरंजी- येथील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिराच्यावतीने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शहरातील महानगरपालिकांच्या शाळांतील मुलांना पुस्तके वाचण्यास मिळावीत यासाठी फिरते ग्रंथालय सुरु करण्यात आले. सर्वप्रथम चंदूर रस्त्याकडील दुर्गा माता मंदिर जवळील शाळा क्रमांक २८, सोलगे मळा येथील शाळा क्रमांक ३०, लिगाडे मळा परिसरातील शाळा क्रमांक १० आणि आय जी एम परिसरातील शाळा क्रमांक २७ या चार शाळांना प्रत्येकी १०० पुस्तके देण्यात आली रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. अलका शेलार यांनी केले. मान्यवरांचे रोपे देऊन स्वागत करण्यात आले. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथालयाच्या उपाध्यक्ष हर्षदा मराठे यांनी या उपक्रमामागील हेतू स्पष्ट केला. उद्याचा डॉ. एपीजे अब्दुल कलामांच्या स्वप्नातील भारत या लहान मुलांच्या कर्तृत्वातूनच साकारला जाणार असून त्यांचे व्यक्तिमत्व सुजाण, सुशिल आणि सुसंस्कृत होण्यासाठी आपटे वाचन मंदिर मुलांपर्यंत पुस्तके घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रंथालयाचे संचालक अॅड. स्वानंद कुलकर्णी यांनी शाळांमधील शिक्षकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घ्यावा. मुलांपर्यंत पुस्तके पोहचवावीत. त्यांना वाचते, लिहिते, विचारकर्ते बनवावे. वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व वाचनातून घडावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रशासन अधिकारी इरफान पटेल व महानगपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करुन ग्रंथालयाला धन्यवाद दिले ही पुस्तके शाळांमधून फिरती होऊन नवनवीन पुस्तके सर्व शाळांपर्यंत पोहचावीत अशा भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी महानगरपालिकेच्या शाळांना श्रीमंत जहागिरदार श्री लक्ष्मी व्यंकटेश देव ट्रस्ट यांच्यावतीने अॅड. स्वानंद कुलकर्णी लिखित ओंजळीतील चाफा हे पुस्तक प्रदान करण्यात आले.
या समारंभाचे सूत्रसंचालन अजित शेट्टी यांनी केले. आभार प्रदर्शन ग्रंथालयाच्या कार्यवाह माया कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांनी केले. याप्रसंगी शाळांचे मुख्याध्यापक, विदयार्थी तसेच आपटे वाचन मंदिराचे सहकार्यवाह डॉ. कुबेर मगदूम, संचालक अशोक केसरकर, काशिनाथ जगदाळे उपस्थित

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800