विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त करणेत आलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न
इचलकरंजी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या अनुषंगाने २७९ इचलकरंजी विधानसभा मतदार संघामधील मतदान केंद्रावर नियुक्ती केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे तसेच प्रत्यक्ष ई.व्ही.एम. हाताळणी (Hands On Trainning) प्रशिक्षणाचे आयोजन डि.के.टी.ई इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यु. कॉलेज, इचलकरंजी येथे शनिवार दि. २६ ऑक्टोंबर आणि रविवार दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० ते १.०० आणि दुपारी २ ते ६ अशा दोन सत्रात निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करणेत आले होते.
सदर प्रशिक्षणा दरम्यान सत्रात निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी काटेकोरपणे निवडणूक कामकाजाची जबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले. त्याचबरोबर ई.व्हि.एम. हाताळणी प्रशिक्षणाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना ई. व्हि.एम. हाताळणी बाबत आवश्यक मार्गदर्शन केले.
रविवार दि.२७ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षणाचे सकाळच्या सत्रात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन नियुक्त केलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे आणि निर्भिडपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी निवडणूक कामकाज करावे असे आवाहन केले.
सदर दोन दिवसांच्या प्रशिक्षणास इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच प्रत्यक्ष मतदाना दिवशी नियुक्त करणेत आलेले जवळपास १२०० अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
सदर प्रशिक्षण एल.ई.डी. स्क्रीनवर पी.पी.टी.च्या माध्यमातून स्लाईड् शोद्वारे महानगरपालिका सहा.आयुक्त तथा प्रशिक्षण विभागाचे नोडल अधिकारी विजय राजापुरे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना दिले.
त्याचबरोबर या प्रशिक्षणाचे ठिकाणी निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे १२ / १२ ए फॉर्म भरून घेऊन एकही अधिकारी कर्मचारी मतदाना पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणेत आलेली आहे.
या प्रसंगी महानगरपालिका उपायुक्त प्रसाद काटकर, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, उप निबंधक सदाशिव जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, नायब तहसीलदार संजय काटकर यांचेसह मंडल अधिकारी, तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800