थोरात चौकात लागले फटाके स्टॉल,नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्याचे इनामचे आवाहन.
इचलकरंजी
इनामच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने इचलकरंजी शहरातील नियम पाळून फटाके विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी खवरे मार्केट जवळील फुटपाथवर परवानगी घेऊन जवळपास २५ स्टॉल लावले आहेत.विस्फोटक अधिनियम १८८४ नुसार औद्योगिक वसाहतीत व मुख्य रस्त्यावर फटाके विक्री करण्यास बंदी आहे,त्यामुळे प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच फटाके विक्री करता येते. महसूल, महापालिका व पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागी खवरे मैदान जवळील फुटपाथवर आज जवळपास २५ फटाके विक्रेत्यानी आपले स्टॉल लावले असून त्याचे उद्घाटन इचलकरंजी नागरिक मंचच्या कार्यकर्त्यांनी केले.ज्येष्ठ विधितज्ञ एस बी सावेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर इनामचे अध्यक्ष अभिजित पटवा यांच्या हस्ते फित कापून स्टॉलचा शुभारंभ करण्यात आला.
प्रामाणिकपणे नियमात व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांच्या सोबत इनाम नेहमी खंबीरपणे उभे असणार अशी ग्वाही इनामच्या वतीने देण्यात आली.यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाचे सुभाष आवळे यांचाही विक्रेत्यांनी सत्कार केला.यावेळी सर्व फटाके विक्रेते तसेच इनाम सदस्य राजु कोन्नुर,शितल मगदुम,बाळु भंडारी,हरीश देवाडिगा उपस्थित होते.
तरी इतरत्र कोणीही नियमबाह्य फटाके विक्री करू नये व कटू कारवाईचा प्रसंग टाळावा तसेच नागरिकांनी थोरात चौक येथूनच फटाके खरेदी करावेत असे आवाहन इनामच्या वतीने करण्यात आले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800