अन्नदान श्रेष्ठदान उपक्रमाला माय फौंडेशन,डाके कॅपिटलचा हातभार,दिवाळीसाठी लागणारे साहित्य व मिठाईचे वाटप.
इचलकरंजी
इचलकरंजी : शहरातील विविध भागांत राहणाऱ्या ५५ निराधार कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना १ मे २०२१ कोरोना काळातील लॉकडाऊनपासून दररोज घरपोच जेवण देण्यात येते. त्या निराधारांची दिवाळी आनंदाने साजरी करण्यासाठी हातभार म्हणून माय फौंडेशन व डाके कॅपिटलच्या वतीने दिवाळीसाठी लागणारे १६ साहित्य आणि मिठाई,फराळ व दिपावली किटचे वाटप करण्यात आले.
इचलकरंजी नागरिक मंच बिझसेन पॉर्इंट ग्रुप, जेंटलमन ग्रुपच्या वतीने निराधार कुटुंबांना जेवण देण्याचा उपक्रम लॉकडाऊनमध्ये हाती घेण्यात आला. असाह्य वयस्कर असलेल्या व्यक्तींना कोठेही जाऊन जेवणाची व्यवस्था करता येत नाही,अगदी मोफत मिळत असलेले जेवण सुद्धा जाऊन घेता येत नाही अशा व्यक्तींची लॉकडाऊनमध्ये कुचंबना होत होती. ही बाब समोर आल्याने वरील तीन सामाजिक संस्थांनी त्यांची जबाबदारी घेत अन्नदान उपक्रमाची सुरूवात केली. ती आजतागायत सुरू आहे. १३०० दिवसाकडे वाटचाल सुरू असलेल्या अखंडित उपक्रमाला समाजातील विविध दानशूरांकडून अन्नदानासाठी मदत मिळते.वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस,वडिलधाऱ्यांचे श्राद्ध, काहींच्या स्मरणार्थ अशा विविध हेतूने अन्नदान केले जाते.त्यासाठी एक दिवसाचा दोनवेळचा जेवणाचा खर्च म्हणून संबंधितांकडून ३१०० रुपये स्वीकारले जातात.त्यातूनच हा उपक्रम सुरू आहे.तसेच ज्यांना स्वइच्छेने कोणत्याही रकमेची अन्नदानासाठी मदत करावयाची झाल्यास वरील संस्थांकडे तसेच अभिजीत पटवा,दीपक निडगुंडेकर, संजय डाके यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
दिवाळीसाठी लागणारे १६ साहित्य आणि मिठाईचे वाटप कार्यात डाके कॅपिटलसह इनरव्हिल क्लबचेही सहकार्य लाभले. यावेळी वासुदेव तोतला, दीपक बियाणी, गोपाल चांडक, दिनेश बांगड, सुशिल इनानी, अरुण बांगड, आदी उपस्थित होते.
इचलकरंजीतील अन्नदान श्रेष्ठदान या दररोज जेवण घरपोच देणाऱ्या उपक्रमांतर्गत माय फौंडेशनने दिवाळीनिमित्त साहित्य व मिठाईचे वाटप केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800