इचलकरंजीचा सर्वांगीण विकास साधणार-वंचित बहुजन आघाडीचे शमशुद्दीन मोमीन.
इचलकरंजी
इचलकरंजी विधानसभा मतदार संघात प्रलंबित प्रश्न सोडवून सर्वांगीण विकास साधणार असल्याची वंचिन बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शमशुदीन मोमीन यांनी पत्रकार पत्रकार परिषदेत दिली.
स्वागतपर प्रास्ताविक डि एस डोणे यांनी करताना इचलकरंजीला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळत नाही. सध्या कृष्णा नदीतून पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते तर पंचगंगा नदीतून काही प्रमाणात पाणी घेतले जाते. पंचगंगा नदीतील पाणि वारंवारं प्रदूषित होत असल्याने पर्यायी योजना मिळावी अशी मागणी नागरिकांची आहे.
प्रथम वारणा योजना मंजूर झाली पण नदीकाठजवळील लोकांचा विरोध झाल्याने ती योजना रद्द झाली या नंतर कागल तालुक्यातील सुळकूड गावा जवळील दूधगंगा नदीतून पाणी घेण्याची योजना पुढे आली. मात्र त्यालाही विरोध झाला आहे.
कृष्णा योजनेच्या नळ पाईपना सारखी गळती लागत असल्याने नागरिकांना खंडीत पाणि पुरवठा होतो. सहा-आठ दिवसांनी एक वेळ पाणि दिले जाते.पूर्व,दक्षिण,उत्तर अशा बाजूला शहरानजीक तीन नद्या असूनही इचलकरंजीला पाणी टंचाई आहे.याला राजकारण जबाबदार आहे.इचलकरंजी शहर वाढते गाव आहे.वस्रोद्योगामुळे नोकरीं उद्योग व्यापार करण्याची संधी मिळते यामुळे अनेक जण विविध प्रांतातून इचलकरंजीत येत असतात. त्यांना नागरी सुविधा देणे गरजेचे आहे. चांगले रस्ते, नीट नेटके स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृह, पिण्याचे पाणि, वृक्ष संवर्धन, बागबगीचे, नाना नानी पार्क, रस्ते फुटपाथ, सार्वजनिक उपक्रमा साठी वा जाहीर सभेसाठी जागा, क्रीडागंणे, प्राथमिक शाळा च्या सुविधा, रहदारीच्या ठिकाणी वाहतूक सुविधा, जरूर तेथे उड्डाणं पूल, मैलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, आदी कामे सक्षमपणे करणे आवश्यक आहे.
औद्योगिक गावातील उद्योगा मुळे रोजगार तसेच कर रूपाने शासनास महसूल मोठ्या प्रमाणात मिळतो. या मुळे कामगार कल्याण योजना, दवाखाना, नियोजन यांची गरज आहे.
वस्रोद्योग चालण्या साठी सुविधा, त्या उद्योगास मदत करण्या साठी सहकार्य करणे, नदी स्वच्छ ठेवणे, गाळ काढणे, कामाची गरज आहे.
प्रभाग नंबर आणि चौकाची अधिकृत नावे देऊन नवी ओळख बनविणे. अतिक्रमण वेळीच हटविणे, फेरीवाला सुधारणा, प्रभागा तून भाजी व फळ मार्केट उभारणे, वाहने पार्किंग, आदी सुविधा देणे या जबाबदारीची कामे होणे आवश्यक आहे. नागरीकां साठी सार्वजनिक बस व्यवस्था करणे आमचे उद्दिष्ट असून आम्ही यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी अँड महेश कांबळे इचलकरंजी शहर अध्यक्ष,
वैशाली कांबळे महिला अध्यक्ष,बी आर कांबळे,राजराम माळगे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







