महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची मोहन चौगुले यांच्या निवासस्थानी भेट.
इचलकरंजी
महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे विद्यमान अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमान न्यायमूर्ती के.के.तातेड साहेब हे कोल्हापुर च्या दौऱ्यावर आले असता त्यांनी इचलकरंजीत श्री मोहन चौगुले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी प्रारंभी सौ.अनिता चौगुले व सौ.अश्विनी चौगुले यांनी कुकुंम टिळक लावून औक्षण केले नंतर चौगुले कुटुंबियांच्या वतीने आमच्या परिवारातील ज्येष्ठ मातृतूल्य दैवत वंदनीय श्रीमती सुशिला आण्णासो चौगुले यांच्या अमृत हस्ते आदरणीय श्रीमान न्यायाधीश के.के.तातेड साहेब यांना राजस्थानी पगडी ,शाल,व बुके देऊन यथोचित सन्मान करून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री मोहन चौगुले, श्री आदिनाथ को-ऑप बॅकेच्या संचालिका सौ.अनिता चौगुले,श्री मिलिंद चौगुले,सौ.अश्विनी चौगुले ,श्री प्रथमेश चौगुले,श्री तेजस गाट, श्री श्रेयांस चौगुले,कु.सिध्दी चौगुले,श्री श्लोक चौगुले,आदि चौगुले कुटुंबिय तसेच इचलकरंजी बार असोसिएशन चे विद्यमान अध्यक्ष श्री अॅडव्होकेट आर.आर.तोष्णीवाल, उद्योगपती श्री श्रीवल्लभ बांगड, उद्योगपती श्री हिराचंद बरगाले आदि मान्यवर उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800