डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये देशात अव्वल स्थान व दोन लाखाचे पारितोषिके प्राप्त.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये देशात अव्वल स्थान व दोन लाखाचे पारितोषिके प्राप्त.
इचलकरंजी
गीक्स फॉर गीक्स आणि वलचर लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय स्तरावरील क्लाउड इन्व्होवेटीव्ह हॅकॅथॉन’ या स्पर्धेमध्ये डीकेटीईचे विद्यार्थी सुमित पडळकर, साहिल मुलाणी हे देशामध्ये अव्वल ठरले व दोन लाख रुपयाचे बक्षिस पटकावून त्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय नोकरीसाठीच्या  इंटरव्हयुवसाठी संधी मिळवीली आहे इंटरव्हयूव पूर्ण केल्यानंतर दोघांना वलचर लि. या नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे .
गीक्स फॉर गीक्स आणि वलचर लि. यांनी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय क्लाउड इन्व्होवेटीव्ह स्तरावरील हॅकॅथॉन’ या स्पर्धेमध्ये देशभरातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी यांच्या मार्फत देण्यात आलेल्या विषयावर विद्यार्थ्यांनी आधुनिक संकल्पनेव्दारे त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देत समाजोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी भारतातून एकूण ५५० हून अधिक संघानी सहभाग नोंदवला होता. त्यानंतर ग्रँड फायनल मध्ये निवडक उत्कृष्ट टीमची निवड झाली होती यामध्ये डीकेटीईच्या बी.टेक. एआयडीएस इंजिनिअरींग मध्ये शिकत असलेले सुमित पडळकर व साहिल मुलाणी या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत भारतातून प्रथम येण्याचा मान पटकावला.
गीक्स फॉर गीक्स हे एक लोकप्रिय ऑनलाईन प्लॅटफॉर्म असून प्रामुख्याने कॉम्पुटर सायन्स, प्रोग्रॅमिंग आणि तंत्रज्ञानावर केंद्रित शैक्षणिक सामग्री प्रदान करते. विद्यार्थी, प्रोग्रामर आणि व्यावसायिक त्याचा वापर कोडिंग संकल्पना शिकण्यासाठी मुलाखातीची तयारी करण्यासाठी आणि तांत्रिक कौशल्य वाढवण्यासाठी मोठया प्रमाणावर करतात तसेच वलचर लि. ही क्लाउड इन्फ्रान्स्ट्रक्चर कंपनी आहे जी व्यवसाय आणि विकासांसाठी स्केलेबल आणि उच्च कार्यक्षमता क्लाउड कॉम्प्युटिंग सेवा देते. यांच्या द्वारे अयोजित केलेल्या हॅकेथॉन स्पर्धेत विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त कलागुणांना आणि प्रोग्रमिंग कौशल्यांना वाव देण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देते. स्केलेबल वेब ऍप्लीकेशन, प्रगत डेटा स्टोरेेज आणि एआय शक्तीवर चालणा-या सोल्यूएशन यांसारख्या डोमेनवर नाविण्यपूर्ण प्रोग्रॅमिंग कौशल्य विकसित करण्यासाठी या प्लॅटफॉर्म चा उपयोग होतो.
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे कौशल्य आणि नाविण्यपूर्ण उपयांसह देशातील सहभागी झालेल्या सर्व टीम्स मध्ये अव्वल स्थान पटकविले. डीकेटीईमध्ये नेहमी अशा पध्दतीच्या हॅकेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध करुन देते या मध्ये यशस्वी होण्यासाठी येथील तज्ञ प्राध्यापकाकडून विविध प्रकारच्या ट्रेनिंग आणि प्रॅक्टीकलची तयारी करुन घेतली जाते. अभ्यासाव्यतीरिक्त इंडस्ट्रीला लागणा-या नविन टेक्नॉलॉजी संदर्भात कार्यशाळा आयोजित केल्या जातात त्यामुळेच डीकेटीईचे विद्यार्थी  देशभरात चमकतात.
विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन केले तसेच इन्स्टिटयूटच्या संचालिका प्रा.डॉ. प्रा.डॉ. एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे.पाटील, विभागप्रमुख एआयडीस डॉ टी.आय बागवान यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी – राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेमध्ये डीकेटीईचे विद्यार्थ्याना प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाल्याबददल सत्कार करीत असताना संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, डॉ एल.एस.आडमुठे व इतर.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More