अ.लाटचा जिनेंद्र सांगावे नॅशनल डर्ट ट्रॅकस्पर्धेत डब्बल चॅम्पियन 
इचलकरंजी :
एम आर एफ नॅशनल डर्ट ट्रॅक चॅम्पियनशिप २०२४ व एम आर एफ नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप २०२४ या टू व्हिलर बाइक स्पर्धेत जिनेंद्र सांगावे याने फॉरेन बाइक ग्रुप ए २५० सीसी विभागात देशात प्रथम क्रमांक मिळवीत डबल चॅम्पियनशिप झाला. अ. लाट (तालुका शिरोळ) येथील सोळा वर्षीय जिनेंद्रने पुन्हा एकदा नवीन रेकॉर्ड करत या स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवला आहे.
एम आर एफ टायर च्या वतीने नॅशनल चॅम्पियनशिप टाइटल साठी च्या स्पर्धा श्याम कोठारी व गॉडस्पीड टीम पुणे वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. यात बाइक स्पर्धा मध्ये जिनेंद्र सांगावे याने फॉरेन बाइक ग्रुप ए २५० सीसी विभागात ज्युनिअर गटात भाग घेतला होता. या दोन्ही चॅम्पियनशिप स्पर्धा साठी एकूण १० स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धा कोइमतूर, नाशिक, कोल्हापूर, बडोदा, जयपूर, नागपूर, भोपाळ, बंगलोर आणि कोचिन ह्या १० मोठ्या शहरामध्ये आयोजीत झाल्या. सर्व प्रथम एम आर एफ नॅशनल डर्ट ट्रॅक चॅम्पियनशिप मध्ये कोल्हापूर , बरोडा , जयपूर आणि नागपूर या ठिकाणी पार पडल्या , या चार ही स्पर्धा जिनेंद्रने प्रथम क्रमांकाने जिंकल्या. नागपूर येथे झालेल्या स्पर्धे नंतर जिनेंद्र सांगावे डर्ट ट्रॅक चा नॅशनल चॅम्पियन घोषित झाला.
या नंतर एम आर एफ नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप २०२४ मध्ये एकूण ६ रेस होत्या. या स्पर्धा कॉइम्बतूर, नाशिक, भोपाळ,पुणे, बेंगलूरु, आणि कोचीन पार पडल्या. त्यातही जिनेंद्रने ६ पैकी ६ रेस जिंकून कोचीन (केरळ) येथे अंतिम स्पर्धे मध्ये सुपरक्रॉस नॅशनल चॅम्पियन ठरला.
जिनेंद्र हा अल्पभूधारक कुटुंबातून आणि एका छोट्या खेडे गावातून असून या कुटुंबाला मोटर स्पोर्ट्स चा कोणताही अनुभव नसताना केवळ जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर आज पर्यत १७५ पेक्षा जास्त वेगवेगळी पदकांची मिळकत करत ५ वेळा चॅम्पियन झाला,असे जिनेंद्र चे मार्गदर्शक सागर सांगावे यांनी सांगितले.
या स्पर्धा खेळण्यासाठी प्रायोजक म्हणून एक्सोर हेल्मेट कंपनी बेळगावी, जोल्ले ग्रुप एक्सम्बा, प्रकाश आवाडे क्रीडा प्रतिष्ठान , मोहिते रेसिंग अकडमी यांचे बहुमोल साथ मिळाली तर प्रीतम पाटील, कुंतीनाथ बरगाले, दिलावर बैरागदार , रियाज शेख यांचे सहकार्य आणि पिंकेश ठक्कर पुणे, सोहम दळवी पुणे, सचिन घोरपडे कोल्हापूर, विराज कोथळे यांचे मार्गदर्शन मिळाले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800