रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी तर्फे कोल्हापूर येथे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन
कोल्हापूर
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अॅड रिसर्च इन्स्टिट्यूट कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, पश्चिम महाराष्ट्रामध्ये भव्य मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन कोल्हापूर येथे दिनांक २३ ते २५ जानेवारी २०२५ रोजी आयोजित केले आहे. या प्लास्टिक सर्जरी शिबिराचे हे २३ वे वर्ष आहे. हे शिबिर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी, कोल्हापूर येथे आयोजित केले आहे.
या शिबिरात राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध सर्जन डॉ. एस. पी. बजाज (दिल्ली), डॉ. रवींद्र ताह (लुधियाना), डॉ. हिरेन भट्ट (बडोदा), डॉ. पियुष दोशी (बडोदा), डॉ. निलेश पाटोदरा (राजकोट), डॉ. राजेंद्र गांधी (पुणे), डॉ. अरुण देशमुख, डॉ. शीतल मूरचिटे (कोल्हापूर) यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिरात जन्मतः फाटलेले ओठ, टाळू, जन्मतः लघवीचा बदललेला मार्ग, चेहऱ्याची विद्रुपता करणारे व्यंग, भाजल्यामुळे आलेली विद्रुपता, स्नायूंच्या आखडलेपणा, विद्रूप बोटे, बसलेले नाक, कॅन्सर मुळे आलेली विदुपता आदी स्वरूपाच्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील.
या शिबिरात भाग घेणाऱ्या रुग्णांची शस्त्रक्रिया पूर्वी प्राथमिक तपासणी १६ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. तरी रुग्णांनी आपली नावे त्वरित रोटरी समाज सेवा केंद्र महावीर गार्डन जवळ, कोल्हापूर डॉ. अभिजीत हावळ मोबाईल नंबर 9371102880, रोटरी श्रीमती सोनीदेवी रामविलास बाहेती सेवा केंद्र, दाते मळा, इचलकरंजी येथे फोन नंबर 0230-2420652, मो. नं. 7020494047 यावर नाव नोंदवून अधिक माहिती घ्यावी, तरी या पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या भव्य अशा मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा व नाव नोंदणी त्वरित करून सहकार्य करावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष रो. अरुण गोयंका, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष रो. संतोष पाटील व प्लास्टिक सर्जरी कमिटी चेअरमन रो. रिशी मोहनका यांनी केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800