रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचा ४८ वा चार्टर डे उत्साहात साजरा
इचलकरंजी :
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीने ४८ वा चार्टर डे उत्साहाने साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात केक कापून करण्यात आली. या वेळी क्लबचे पास्ट प्रेसिडेंट्सचा त्यांनी क्लबला दिलेल्या योगदानाबद्दल यथोचीत सन्मान करणेत आला. मुख्य अतिथी म्हणून रो. अमित माटे (गव्हर्नन्स रिप्रेझेंटेटिव्ह, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, प्रांत ३१७०) आणि रो. यतीराज भंडारी (गव्हर्नर२०१४, प्रांत 3170) उपस्थीत होते.प्रोजेक्ट चेअरमन रो. आण्णा पोवाडी क्लब सर्व्हीस डायरेक्टर सुशील माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सुरवात करणेत आली. त्यांनी क्लबच्या कार्याची प्रशंसा करत आगामी सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
स्वागत व प्रास्तावीक क्लब अध्यक्ष रो. संतोष जे. पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख रो. नेमिनाथ कोथळे यांनी केली. सचिव रो. चंद्रकांत मगदूम यांनी क्लबच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीवर प्रकाश टाकला. विशेषतःॲन्स सौ. सन्मती पाटील (सचिव, रोटरी ॲन्स क्लब) व ॲन्स सौ. स्वाती सातपुते (अध्यक्ष, रोटरी ॲन्स क्लब) यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक झाला.
कार्यक्रमाचा समारोप सुमधुर गीतांनी झाला. उपस्थित सदस्यांनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले आणि क्लबच्या पुढील उपक्रमांसाठी सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला. चार्टर डे चे निमित्त साधून गरजू व्यक्तीस व्हीलचेअर रो. सुशील माहेश्वरी यांनी आपल्या वाढदिवसा निमीत्त भेट दिली. तसेच क्लब तर्फे गरजू विद्यार्थाना वह्या वाटप करणेत आल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रो. रवी नाकील व मनीष मुनोत यांनी केले. कार्यक्रमास रोटेरियन्स, ॲन्स व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या चार्टर्ड डे समारंभात प्रमुख पाहुणे अमित माटे यांच्या हस्ते दिव्यांगास व्हीलचेअर प्रदान करताना शेजारी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील,अण्णासो पोवाडी,सुशील माहेश्वरी,यतीराज भंडारी,सौ. स्वाती सातपुते व सौ. सन्मती पाटील

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800