श्रीराम शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्या मंदिर मध्ये फाय फाऊंडेशन इचलकरंजी यांचेकडून शैक्षणिक साहित्य प्रदान
इचलकरंजी –
येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक वि-में या शाळेला प्रतिथयश उद्योगसमूह फाय फाऊंडेशन, इचलकरंजी यांचेकडून सी.एस. आर फंडातून कलर प्रिंटर, स्कॅनर, झेरॉक्स कॉपी मशिन,ओव्हरहेड प्रोजेक्टर प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे संस्थापक मा. नंदकुमार इनामदार सर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय करून देताना फाय फाऊंडेशन इचलकरंजी या उद्द्योगसमुहाची औद्योगिक जगतात अतुलनीय कामगिरी असल्याचे प्रतिपादन केले. कै. पंडितकाका कुलकर्णी यांनी सुरु केलेला हा उद्योगसमूह जागतिक दर्जाच्या मानांकनास व गुणवत्तेस जगतविख्यात असल्याचे प्रतिपादन केले. या उद्योगसमूहाचे नवनिर्वाचित एम.डी. मा. श्री अमोद अजित कुलकर्णी यांनी लहान वयातच उद्योगसमूहाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. सरांनी
पुढे बोलताना मीरा मोटारगाडी (कार) चा अप्रतिम किस्साही सांगितला. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगसमूहाचे सर्वश्री राजू श्रीनामे (H.R) सतिश दड्डीकर (एक्सपोर्ट मॅनेजर)अंकुश पायमल्ले (चीफ अकाऊंटंट) तसेच अल्ताफ पठाण सुपरवायजर (आर के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज) यांचा परिचय करून दिला.
त्यानंतर सरस्वतीपूजनाने कार्यक्रमास सुरवात झाली. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.रजिया पठाण मॅडम यांनी आपल्या मनागतोतून शाळेच्या सुरवातीपासून शाळेच्या शैक्षणिक कामाचा आढावा घेतला. नंतर पाहुण्यांच्या हस्ते
शैक्षणिक साहित्य प्रदान करणेत आले. याचवेळी अल्ताफ पठाण यांनी शास्त्रीय संगीत वृद्धी साठी शाळेला हार्मोनिअम भेट दिली. पाहुण्यांच्या सत्कारानंतर सर्वच पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या कामकाज व शैक्षणिक दर्जाबाबत प्रशंसा केली. यापुढेही शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही देणेत आले.सौ.प्रियंका आरेकर मॅडम यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला.
फोटो-
सर्वश्री डावीकडून सतिश दड्डीकर,राजु श्रीनामे,अल्ताफ पठाण, अंकुश पायमल्ले, यांचेकडून,” शैक्षणिक साहित्य स्विकारताना संस्थापक नंदकुमार इनामदार सर.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800