शिवाजीनगर पोलिसांकडून चोरीच्या ७ मोटर सायकली जप्त २ लाख ५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत.चोरीचे ५ गुन्हे उघड.
इचलकरंजी
शिवाजीनगर पोलिसांना चोरीच्या ७ मोटर सायकली जप्त करून २ लाख ५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करत चोरीचे -५ गुन्हे उघड करण्यात यश मिळवले.शिवाजीनगर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाने सदर कारवाई केल्याची माहिती पो नि सचिन पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
इचलकरंजी पोलीस ठाण्यात
विशाल थोरात मुसळे हायस्कूल जवळ यांनी २५ सप्टेंबर रोजी रोजी १ ते ६ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंद झाला होता.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना धर्मराज चौक येथे पवन दिलीप लोकरे वय २६ रा.तळंदगे फाटा,पट्टणकोडोली ,राकेश कमलाकर माने , वय २८ रा.रांगोळी ता. हातकणंगले हे संशयास्पद रीतीने विनानंबर प्लेट गाडीवरून फिरत असताना आढळून आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर मोटारसायकल त्यांनी ३-४ वर्षांपूर्वी इचलकरंजीतुन चोरी केल्याची माहिती दिल्याने त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदलगा कर्नाटक,गोकुळ शिरगाव,शिरोळ,शाहूपुरी येथे चोरी केल्याचे कबूल केले,त्यांच्याकडून ७ मोटारसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत
सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील मा. उप विभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. सचिन पाटील,सहा फौजदार रावसाहेब कसेकर,पो.अं.विजय माळवदे,सुनील बाईत,सतीश कुंभार,सुकुमार बरगाले,पवन गुरव,अरविंद माने यांनी केली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800