भाविक भक्तांच्या मांदियाळीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती उत्साहात
इचलकरंजी:
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र नदिवेस नाका,इचलकरंजी येथे श्री गुरू दत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला. श्री दत्तजयंती सोहळ्या वेळी हजारो भाविक सेवेकरी यांनी सेवा केंद्रात उपस्थिती लावली होती.
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (नदिवेस नाका) यांचेवतीने श्री दत्त जयंती निमित्त 09 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण, अखंड नाम जप, यज्ञयाग सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते..
सोमवार पासून श्री गुरुचरित्र पारायण तसेच दररोज एक याप्रमाणे श्री गणेश याग, मनोबोध याग, श्री चंडी याग, श्री गीताई याग, श्री स्वामी याग, श्री रुद्रयाग,श्री मल्हारी याग संपन्न झाले. तसेच सप्ताह कालावधीत संपूर्ण दिवसभर महिलांचे तर रात्रभर पुरुष सेवेकरी यांचे वतीनेअखंड प्रहरे ची सेवा करण्यात आल्या. रविवार १५ डिसेंबर रोजी दुपारी १२.३९ वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी। शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या सुविद्य पत्नी सौ रुपाली रविंद्र माने यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.सोमवार १६ डिसेंबर रोजी सत्यदत्त पूजन करून सकाळी १०.३० वाजता महाआरती होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे. सप्ताह काळात श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाळ आरती तसेच मानवीय जीवनातील विविध समस्यांवर आध्यत्मिक सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येत आहे असे सेवा आवाहन केंद्राचे वतीने करण्यात आले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800