श्री दगडूलाल मर्दा फौंडेशनतर्फे रक्तदान संपन्न.
इचलकरंजी:
येथील श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फौंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे स्व. श्री दगडूलालजी मर्दा यांच्या ४८व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदरच्या शिबिरामध्ये १२५ युनिट रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले.
मर्दा फौंडेशनचे कार्यकारी विश्वस्त शामसुंदरची मर्दा यांच्या हस्ते स्व. दगडूलालजी मर्दा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमासाठी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त श्री ओमप्रकाश दिवटे तसेच शहरातील मान्यवर आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिरासाठी एच डी एफ सी बँकेचे विशेष सहाय्य लाभले. शहरातील सुजाण नागरिक आणि मर्दा उद्योग समूहातील कर्मचारी यांनी स्वेच्छेने रक्तदानामध्ये सहभाग नोंदविला.
या रक्तदान शिबिराकरिता लायन्स ब्लड बँक, इचलकरंजी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचा समारोप ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
रक्तदान शिबीर प्रसंगी उपस्थित आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि इतर मान्यवर

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800