५० व्या साहित्य संमेलनाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त इचलकरंजीत “स्मृतिजागर”- प्रकाश आवाडे.
इचलकरंजी
शहरामध्ये २६ ते २८ डिसेंबर १९७४ रोजी पन्नासावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. या साहित्य संमेलनाला २६ डिसेंबर २०२४ रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने साहित्य संमेलनाच्या स्मृतीना उजाळा देण्यासाठी “स्मृतिजागर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.आपटे वाचन मंदिर या कार्यक्रमाचे निमंत्रक असणार आहेत.
महाराष्ट्राला साहित्य क्षेत्राची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे इचलकरंजी येथे २६ ते २८ डिसेंबर १९७४ रोजी पन्नासावे साहित्य संमेलन पार पडले होते. आज पर्यंत झालेल्या सर्व साहित्य संमेलनामध्ये इचलकरंजीचे साहित्य संमेलन हे प्रभावी व उत्कृष्ठ ठरले होते.याबाबत आजही साहित्य क्षेत्रातून त्याच्या आठवणी काढल्या जातात.
याच अनुषंगाने येत्या २६ डिसेंबर २०२४ रोजी इचलकरंजी येथील “स्मृतिजागर” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती देताना आमदार प्रकाश यावेळी म्हणाले गोविंदराव हायस्कूल येथे ५० वे साहित्य संमेलन पार पडले होते तेथूनच ग्रंथ दिंडी काढण्यात येईल त्या ग्रंथदिंडीमध्ये पन्नासाव्या साहित्य संमेलनात पु.ल. देशपांडे यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाची दिंडी असेल.
ग्रंथदिंडी तेथून विद्यार्थ्यांच्या समवेत राजवाडा डिकेटीई येथे जाईल.राजवाड्यात दुग्धपाणाने दिंडीचा समारोप होईल.
त्यानंतर दरबार हॉल येथे ५० वे साहित्य संमेलन बघितलेल्या मान्यवरांच्या संमेलनाबाबत स्मृतींना उजाळा देण्याचा कार्यक्रम संपन्न होईल.यासाठी साहित्य तथा विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनाही आमंत्रित करण्यात आलेले आहे.
त्याचदिवशी रात्री पंडित बाळकृष्ण बुवा स्मृती साधना मंडळ यांच्यातर्फे गायनाचा कार्यक्रम होणार असून त्याचे निमंत्रक अशोकराव सौदत्तीकर असतील तर स्मृतिजागर कार्यक्रमाचे निमंत्रक आपटे वाचन मंदिर असेल. याचबरोबर माजी मंत्री प्रकाश आवाडे हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. पत्रकार परिषदेस दिलीप शेंडे,प्रसाद कुलकर्णी,डॉ रमेश मर्दा,अशोक केसरकर,प्रसाद कुलकर्णी अशोकराव सौदत्तीकर,स्वानंद कुलकर्णी,राजन मुठाणे,पाटलोबा पाटील,रोहित शिंगे उपस्थित होते.
स्मरणिका प्रकाशन.
५० व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्मरणिका काढण्यात आली होती ती या निमित्ताने पुनर्रप्रकाशित करण्यात येणार असून उपस्थिताना त्याचे वितरण करण्यात येणार आहे.असे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.
५० व्या साहित्य संमेलनास २ लाखाचा खर्च.
१९७४ च्या साहित्य संमेलनात अडीच लाख रुपये गोळा झाले होते तर २ लाख रुपये खर्च झाला होता,उर्वरित रक्कम साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट करून त्यानावे ठेवण्यात आली असून त्याच्या व्याजातून कवियत्री इंदिरा संत यांच्या नावे दरवर्षी आपटे वाचन मंदिरा तर्फे पुरस्कार देण्यात येतो असे सुषमा दातार यांनी सांगितले.
नियोजनबद्ध कार्यक्रम – प्रसाद कुलकर्णी.
स्मृतिजागर या कार्यक्रमाचे नियमित नियोजन सुरू असून एकंदरीत २ ते अडीच तासांचा नियोजनबद्ध कार्यक्रम होणार असून यामध्ये साहित्य संमेलनाच्या स्मृती लघुपटाद्वारे दाखवण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ साहित्यिक प्रसाद कुलकर्णी यांनी दिली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800