सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरवासियांना त्रास.निकृष्ट दर्जाचे कामकाज,अधिकारी दबावात.अपघातास निमंत्रण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरवासियांना त्रास,निकृष्ट दर्जाचे कामकाज,अधिकारी दबावात. अपघातास निमंत्रण.

अपघातात जखमींची प्रतिक्रिया
https://youtu.be/gUZv8TBE0fs?si=ZQTx-BoaY4DIGlQc
इचलकरंजी
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इचलकरंजी शहरात ५१ कोटी रुपयांची रस्ते व गटारीची कामे सुरू आहेत.
महापालिकेच्या टक्केवारीला व निकृष्ट कामकाजाला वैतागून माजी आ.प्रकाश आवाडेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे दर्जेदार कामे करून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मार्फत निविदा प्रक्रिया राबवून कार्यादेश दिले.सार्वजनिक बांधकाम विभागाला ना हरकत दाखला देण्यासाठी सत्तेत असणाऱ्या आ.प्रकाश आवाडे यांच्या तत्कालीन ताराराणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उपोषणही करावे लागले.
सुरवातीला दर्जेदार कामाचे नमुने दाखवले असले तरी बऱ्याच ठिकाणी जुने मटेरियल व कमी जाडीची खडी वापरून कामे करण्यात काही मक्तेदाराणी धन्यता मानण्यास सुरवात केली याबाबत तक्रारी झाल्यानंतर कामात सुधारणा करण्याचे आश्वासन मिळत गेले मात्र सद्यस्थितीत गावातील बहुतांशी कामे बंद आहेत.अर्धवट केलेल्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे,मोठी खडी व त्यावर ग्रीड टाकलेली असल्याने जीव मुठीत धरून वाहनधारकांना वाहने चालवावी लागत आहेत तर आसपासच्या व्यावसायिकांच्या दुकानात धूळ जाऊन त्यांचे व मटेरियलचे मोठे नुकसान होत आहे.तर बऱ्याच ठिकाणी अपघातही घडत आहेत.आजच जुने स्टँड ते स्वामी अपार्टमेंट जवळील रस्त्यावर अपघात घडला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मक्तेदारांनी कामकाज का थांबवले याबाबत कसलेही समाधानकारक उत्तर  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देत नसून नागरिक मात्र मनस्ताप सहन करत आहेत.
निकृष्ट दर्जाचे काम तर अनेक ठिकाणी कामे  बंद.
स्टेशन रोड येथे निकृष्ट कामकाजाबद्दल तक्रार झाल्याने सुधारणा झाली तर भोनेमाळ,शाहू हायस्कुल येथे निकृष्ट दर्जाचे काम सुरू असुन केलेले पॅचवर्क उखडले आहे,तर कबनुर येथील स्वामी अपार्टमेंट येथील रस्ते व गटारीचे काम २ महिन्यापासून थांबले आहे,याबाबत वारंवार अभियंत्याना विनंती करूनही कुणाच्या दबावात मक्तेदाराची बाजु घेत आहेत व फक्त गोड बोलून चालढकल करत आहेत.
मक्तेदारांना बिलाची भीती.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने भल्या मोठ्या कामांना मंजुरी दिली आहे मात्र तरतुद अगदी नगण्य करण्यात आली असल्याने मागील बिले प्रलंबित आहेत, त्यामध्ये नविन कामे सुरू करायची असल्याने मक्तेदार आर्थिक विवंचनेत आहेत त्याचा परिणाम होऊन बऱ्यापैकी कामे बंद असल्याचे मक्तेदार दबक्या आवाजात बोलत आहेत.
रस्त्याची उंची वाढली.
बऱ्याच भागात रस्त्यावर रस्ते करत असल्याने रस्त्याची उंची वाढत आहे.कामाचे अंदाजपत्रक करताना फक्त रस्ता कोणता करायचा हे मर्जीतील लोकप्रतिनिधी कडून सुचवले  जाते त्यामध्ये उकरून रस्ता केल्यास जास्त उंची न वाढता रस्ता लेव्हल मध्ये होतो मात्र रस्त्यावर रस्ता केल्याने नागरिकांची घरे खोलात गटारी व रस्ता उंच अशी विचित्र परिस्थिती उद्वभवत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More