‘ चंबळ खोऱ्यातील जलक्रांती ‘ या पुस्तकाचे प्रकाशन
इचलकरंजी –
येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील सहाय्यक शिक्षिका, लेखिका व नदी समन्वयक सौ.रीटा शाल्वादोर रॉड्रीग्युस व राजस्थान येथील सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असलेल्या तरुण भारत संघाचे संस्थापक अध्यक्ष जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह यांनी एकत्रितपणे लिहिलेल्या ‘ चंबळ खोऱ्यातील जलक्रांती ‘ या पुस्तकाचे प्रकाशन २४ डिसेंबर रोजी होत आहे. पूज्य साने गुरुजी यांची १२५ वी जयंती वर्ष व डॉ.द्वारकादास लोहिया (बाबूजी) लोकसहभाग पुरस्कार वितरण सोहळ्यात,राष्ट्रीय जल परिषदेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होत आहे. मराठवाडा नवनिर्माण लोकायत (मानवलोक) व मानवलोक समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई येथे ही राष्ट्रीय जलपरिषद आयोजित करण्यात आली आहे. डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, श्री संजय सिंग,जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.
चंबळ खोऱ्यातील अशांततेच्या व अतिदुर्गम प्रदेशात पाण्याने केलेली क्रांती व त्यामुळे तेथील समाजात झालेल्या मानसिक, शारीरिक, सामाजिक व आर्थिक बदलाची सत्यकथा मांडणारे हे पुस्तक जलप्रेमींसाठी एक दिशादर्शक आहे.
महाराष्ट्रासह जगभरात असणाऱ्या मराठी वाचकांसाठी जलक्रांतीने आणलेल्या शांतीचा अनुभव देणारे हे पुस्तक नक्कीच येणाऱ्या भावी पिढीला प्रेरणादायक आहे.अशी माहिती कार्यक्रम नियोजन समितीकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800