इचलकरंजीत ९ वर्षाखालील शालेय व खुल्या  जलद बुद्धिबळ स्पर्धा-२०२४ संपन्न १५० खेळडूंचा सहभाग,व सोहम खासबरदार (खुला गट )व दिविज कत्रुत(लहान गट ) विजेते

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत ९ वर्षाखालील शालेय व खुल्या  जलद बुद्धिबळ स्पर्धा-२०२४ संपन्न १५० खेळडूंचा सहभाग,व सोहम खासबरदार (खुला गट )व दिविज कत्रुत(लहान गट ) विजेते
इचलकरंजी
 केन बुद्धिबळ अकादमी वर्धापन दिनानिमित लायन्स कल्ब ऑफ इचलकरंजी व केन चेस अॅकडमी इचलकरंजी यांच्यावतीने इचलकरंजीत ९ वर्षा खालील  शालेय व् खुल्याजलद बुध्दिबल स्पर्धा २०२४.रविवारी १५ डिसेंबर  रोजी लायन्स बल्ड्  बैंक दाते मळा इचलकरंजी येथे सकाळी ०९ वाजल्यापासून संपन्न झाल्या
सदर स्पर्धा स्विस लीग पद्धतीने ७ फेऱ्यामध्ये आंतरराष्ट्रीय नियमानुसार पार पडल्या.या स्पर्धेतील विजेत्या दिविज कात्रुत, उपविजेत्यास सांची चौधरी,तृतीय क्रमांकास   पृथ्वीराज पाटील रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले
तसेच स्पर्धेतील चतुर्थ अवनीश जितकर, पाटील अथांग, रोनक झंवर, शौर्य खवट, शंभूराज केणे,ते दहाव्या अर्णव वरूटे  क्रमांकास  रोख रक्कम व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.६ वर्षाखालील सर्वोत्तम खेळाडू सुयोग काकानी,चार्मी शहा,जैन अधीरा ,०७ वर्षाखालील सर्वोत्तम खेळाडू  जय पाटील, रियांश पोदार, सुदर्शन पाटील.०८ वर्षाखालील सर्वोत्तम खेळाडू ना रुद्रवीर पाटील, प्रणव साळुंखे, आदित्यराज निंबाळकर यांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र , तसेच गटातील पात्र मुलीना रोख रक्कम व प्रमाणपत्र शनाया मालानी,सांची बजाज,गार्गी गुरव,
खुल्या गट विजेता सोहम खासबरदार,उपविजेता आदित्य सावलकर, तृतीय क्र.रुषिकेश कबनूरकर रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविन्यात आले.
खुल्या गटा मधे ११ रुचित मुके,विवान सोनी,अद्वैत फडके ,१३ स्कृती सुतार,नंदिनी सारडा,सर्वेश पोतदार.व १५ वर्षाखालील खेळाडू वेदांत कुंभार,आदर्शे यशवर्धन,अनिस मुजावर.बेस्ट बिगर मानकित सौमित्र केळकर,सिद्धेश वड्डे, सर्वोत्तम दिव्यांग पियुष कदम, शिवम केसरवाणी  यांच्यासह  २१ जणांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आली.
उत्कृष्ट खेळ करणाऱ्या पात्र मुलींना रक्कम व प्रमाणपत्र १.सारा हरोळे, २.सिद्धी कर्वे, ३.अन्वी कुणाळे
आणि केन चेस अकॅडमी व चेस अकॅडमी जयसिंगपूर प्रथम ३ उत्कृष्ट खेळाडूंना सुवर्णपदक श्रुती पांडव-अथर्व सुतार ,रौप्यपदक रुतुराज पाटील-  स्वरा पाटनी , कांस्यपदक  पोर्लेकर प्रज्ञा .प्रणव शिंदे असे  एकूण ६ मेडल्स बक्षिसे देण्यात आली .उत्कृष्ट सहभागी शाळा  प्रोत्साहनात्मक विशेष आकर्षक शिल्ड सौ.गंगामाई विद्यामंदिर . या स्पर्धत प्रमुख पाहुण्या सौ.हेमा डाल्या (अध्यक्ष),किरण महाजन व प्रिती पोदार व ला .कृष्णा भराडीया यांनी उद्घाटन बक्षीस वितरण केले.नॅशनल आर्बिटर करण परीट,नॅशनल आर्बिटर रोहित पोळ ,,राज्य  पंच विजय सलगर  यांनी स्पर्धेचे कामकाज बघितले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More