रोटरी क्लब, सेवा भारती व सिद्धगिरी हॉस्पिटल ,कनेरी तर्फे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
इचलकरंजी :
येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ,कनेरी, सेवा भारती इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग, मूत्ररोग, आणि डोळे तपासणी निदान आणि उपचार शिबिर नुकतेच रोटरी श्रीमती सोनीदेवी रामविलास बाहेती सेवा केंद्र दाते मळा ,इचलकरंजी येथे संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील प्रोजेक्ट चेअरमन डॉ.वैभव चव्हाण ,संजय खोत यांच्या उपस्थितीत झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून रोटरी क्लबच्या कार्याची माहिती दिली. सिद्धगिरी हॉस्पिटलचे यूरोलॉजिस्ट डॉ.ज्योती निकम यांनी शिबिराची माहिती देऊन सिद्धगिरी हॉस्पिटल कनेरी येथील रुग्णासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा व वैद्यकीय उपचाराबाबत माहिती दिली .शिबिरात तपासणी करणारे सर्व डॉक्टर्स यामध्ये डॉ.शंतनु पालकर, (कार्डिओलॉजिस्ट ),डॉ. शिवम माने (जनरल मेडिसिन),डॉ. दिपाली चव्हाण (नेत्ररोग विभाग ),ऋतुराज भोसले( पीआरओ) व त्यांचे सहकारी स्टाफ अरुण शेंडोरी ,मोनीश पत्थर, सानिया मुलांनी, प्रणव कांबळे, सुप्रिया लांबोरे, आर्यन चौगुले, सलोनी लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला.
सर्व तज्ञ डॉक्टर्सनी उपस्थित रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येऊन त्यांची ब्लड प्रेशर, शुगर व ईसीजी तसेच अत्याधुनिक मशीनद्वारे रुग्णांची नेत्र तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन करून औषधेही देण्यात आली .या उपक्रमाचे आभार डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांनी मानले. शिबिरा वेळी रोटरीचे संजय घायतिडक ,सत्यनारायण धूत, राजाराम जाधव ,अजित कुरडे ,विक्रम बुचडे ,शिवदास कित्तुरे ,सुनील सातपुते ,पंकज कोठारी ,तसेच सेवा भारतीचे पदाधिकारी स्टाफ उपस्थित होते.
फोटो-
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सिद्धगिरी हॉस्पिटल कनेरी, सेवा भारती आयोजित आरोग्य शिबिर झाले .यावेळी उपस्थित रोटरीचे अध्यक्ष संतोष पाटील, संजय घायतिडक, पंकज कोठारी व इतर पदाधिकारी व डॉक्टर्स

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800