यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची प्रत्यक्ष अमलबजावणीसाठी.राहुल आवाडेंकडून पाठपुरावा
इचलकरंजी:
वस्त्रोद्योगातील प्रमुख घटक असलेला विकेंद्रीत यंत्रमाग उद्योग क्षेत्रातील कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याणकारी मंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे यंत्रमाग कामगारांच्या कल्याणकारी मंडळ संदर्भातील प्रस्ताव तातडीने मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात यावा, अशी मागणी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे केली आहे.
पत्रामध्ये, राज्यातील विकेंद्रीत क्षेत्रातील यंत्रमाग उद्योगातील कामगारांची संख्या प्रचंड आहे. देशभरातील एकूण विकेंद्रीत क्षेत्रातील यंत्रमागांपैकी 55 ते 60 टक्के यंत्रमाग हे महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये कामगारांची संख्याही लक्षणीय आहे. त्याचबरोबर देशातील एकूण कापड उत्पादनापैकी 62 टक्के उत्पादन या विकेंद्रीत क्षेत्रातील यंत्रमाग उद्योगातून होते. या विकेंद्रीत क्षेत्रातील कामगारांसाठी बांधकाम कामगार महामंडळाच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करुन त्या माध्यमातून कामगारांच्या हितासाठी कल्याणकारी योजना राबविणे आवश्यक आहे. या संदर्भात नेमलेल्या कमिटीने सविस्तर अहवाल राज्य शासनाला दिलेला आहे. बांधकाम कामगार महामंडळाप्रमाणेच स्वनिधीतून यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ चालविणेचे आहे. त्यासाठी प्रतिकिलो सूतावर सेस आकारणी करुन त्यातून गोळा होणार्या निधीतून यंत्रमाग कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. हे मंडळ सुरु केल्यास त्याचा राज्य शासनावर कसलाही आर्थिक बोजा पडणार नाही. त्यामुळे शासनाने या मंडळाला विनाविलंब मंजूरी द्यावी. या संदर्भात तत्काली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास मंजुरी दर्शविली आहे. अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असून यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करुन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी तातडीने होण्यासाठी या संदर्भातील प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवावा आणि ते कार्यान्वित करावे, असे आमदार आवाडे यांनी म्हटले आहे.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी या संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रीमंडळासमोर ठेवून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800