सडेतोड लिखाण करण्याची संस्कृती पत्रकारांनी जपावी-आ.राहुल आवाडे.
इचलकरंजी:
सडेतोड लिखाण करण्याची संस्कृती पत्रकारांनी यापुढेही कायम जपावी. यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये एकसूत्रता येऊन शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न, संरक्षण कायदा यासह अन्य प्रश्नांची आपण प्रामाणिकपणे सोडवणूक करू, असे प्रतिपादन आमदार राहुल आवाडे यांनी केले.
प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात आमदार राहुल आवाडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
आमदार राहुल आवाडे म्हणाले की, वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकार जनतेचे प्रश्न मांडतात. यामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासनाची जबाबदारी वाढते. एक लोकप्रतिनिधी म्हणून शहराचा विकासासाठी अधिक निधी आणण्याचा बरोबरच चांगल्या सुविधा देण्याचा आपला प्रयत्न राहील.
ऑनलाईन काम करणाऱ्या पत्रकारांनी कोणत्याही घटनेचे वृत्त प्रसारित करण्यापूर्वी जबाबदारी ओळखून काम करणे अपेक्षित आहे, असे सांगून आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी शहराच्या हितासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम महापालिकेच्या वतीने केले जात आहे. ते नजीकच्या काळात पूर्ण झाल्यास शहराचा चेहरा मोहरा बदलेल तसेच पत्रकारांच्या घरकुल योजनेसाठी आवश्यक सहकार्य करण्याबरोबरच पत्रकार कक्षातील आवश्यक सुविधा नजिकच्या काळात पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
माजी आमदार हाळवणकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून आपण पत्रकारांच्या घरकुलाच्या प्रश्न मांडतो. तेव्हा महापालिकेच्या माध्यमातून नजीकच्या काळात आपल्या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त व्हावे. तसेच पत्रकारांनी आपली लेखणी समाज प्रबोधनासाठी उत्तम कार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने महानगरपालिकेचे जल अभियंता सुभाष देशपांडे, गारमेंट क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सौ राधा खवरे, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या पृथ्वीराज मगदूम तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या किरण लंगोटे यांना गौरविण्यात आले.
प्रारंभी संजय खुळ यांनी स्वागत केले तर दयानंद लिपारे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा सत्कार अध्यक्ष मयूर चिंदे यांनी केला. यावेळी व्यासपीठावर लायन्स क्लबचच्या अध्यक्षा हेमा डाळ्या, भाजपाचे शहराध्यक्ष अमृत मामा भोसले, कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांचेसह मान्यवर, सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष अरुण काशीद यांनी आभार मानले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800