इचलकरंजीत युवकांसाठी राज्यस्तरीय विविध स्पर्धा – युवास्पंदन
इचलकरंजी:
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल या संस्थांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे युवक, युवती आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘युवास्पंदन’ हा राज्यस्तरीय विविध स्पर्धा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमात गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता गीत गायन (कराओके) स्पर्धा होणार आहे. तर शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता वैयक्तिक साहित्य अभिवाचन स्पर्धा होईल.
तिसऱ्या दिवशी शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता स्वरचित काव्य वाचन स्पर्धा होणार आहे. या सर्व स्पर्धा रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र, नाकोडा नगर, इचलकरंजी येथे होतील.
स्पर्धा उपक्रमात रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता वैयक्तिक नृत्य स्पर्धा होईल तर सायंकाळी ५ वाजता समुह नृत्य स्पर्धा होईल. समारोपाच्या पाचव्या दिवशी सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पथनाट्य स्पर्धा होईल तर दुपारी ३ वाजता लघुनाटिका स्पर्धा होईल. या स्पर्धा येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होणार आहेत.
वैयक्तिक स्पर्धांसाठी प्रथम क्रमांक ३००० रुपये, द्वितीय २००० रुपये आणि तृतीय १००० रुपये अशी रोख बक्षिसे व सन्मानचिन्हे आहेत. सांघिक स्पर्धांसाठी प्रथम क्रमांक ७००० रुपये द्वितीय ५००० रुपये आणि तृतीय ३००० रुपये अशी रोख बक्षिसे व सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. आवश्यक वाटल्यास उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.
सदरच्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील तसेच गोवा आणि बेळगाव भागातील १६ ते ३० वयोगटातील युवा कलाकार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. इच्छुकांनी यासाठी अध्यक्ष, मनोरंजन मंडळ, दाते मळा, सुंदर बागेजवळ, इचलकरंजी ४१६११५ (फोन ९९६०००१२०७) या पत्त्यावर १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800