सरकारी कामात अडथळा; तिघांवर गुन्हा दाखल
इचलकरंजी, कोरोची:
आण्णाभाऊ साठे समाज मंदिरासमोर रस्त्यावर लोकांची गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस पाटलाच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पांडुरंग परिट, दत्तात्रय परिट, आणि तेजस परिट (सर्व रा. शहापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवारी रात्री कोरोची येथुन तक्रारदार मारुती यमणाप्पा हेगडे (वय ४२, व्यवसाय- पोलीस पाटील, रा. सिद्धार्थनगर, कोरोची) रस्त्यावर गर्दी पाहून त्यांनी लोकांना घरी जाण्याचे सांगितले. मात्र, आरोपीनी संगणमत करून, “तुम्ही आम्हाला सांगणार कोण?” असे म्हणत हुज्जत घातली आणि वाद निर्माण केला. यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला.
हेगडे यांच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस नाईक वडगावे करत आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800