सरसकट स्मार्ट मीटर बसवणार नसल्याचे महावितरणचे महाविकास आघाडीस आश्वासन.
इचलकरंजी
महाविकास आघाडीच्या वतीने महावितरण चे चिफ इंजिनीअर मा राठीसो यांची भेट घेऊन स्मार्ट व प्रिपेड मिटर बसवणेचे कामाला आमचा विरोध असुन चार तालुक्यात दिलेल्या स्थगीती प्रमाणे इचलकरंजी शहरात ही स्थगीती देणेत यावी अशी मागणी केली. यावेळी मा राठी सो यांनी स्मार्ट मिटर बसवणेचे काम केवळ दोष युक्त मिटर साठी असुन सरसकट मिटर बसवणेत येणार नसलेचे सांगीतले व मिटरचा कोणताही खर्च विज ग्राहकां कडून वसुल केला जाणार नाही असे सांगीतले. जबरदस्तीने मिटर बसवली तर महाविकास आघाडी कठोर विरोध करेल असे आघाडीचे प्रमुखानी सांगितले. या वेळी शशांक बावचकर, संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे,सयाजी चव्हाण,रणजीत जाधव, सदा मलाबादे,राजु आलासे,शशिकांत देसाई इ उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800